चेक छूमंतर करणारी टोळी जेरबंद!


चेक छूमंतर करणारी टोळी जेरबंद!
SHARES

अनिवासी भारतीयांनी त्यांच्या नातेवाईकांना पाठवलेल्या धनादेशांची चोरी करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा मुंबई गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील आरोपी सुनील येरपुडे (५०) हा पोस्टाच्या एअरमेल डिव्हिजनमध्ये काम करतो. तो एअरमेलने तसेच इतर राज्यांतून आलेली अनरजिस्टर्ड टपाल पाकिटे चोरी करून ती पैशांच्या मोबदल्यात विकत असल्याचे समोर आले आहे.

मालमत्ता कक्षाने सुनीलकडून ४५ धनादेश जप्त केले आहेत. मालमत्ता कक्षाने येरपुडेसह संजय जैन (४०), सोहम भनवट (४२), ग्यानचंद परिहार (४५), या तिघांना अटक केली आहे.


अशी व्हायची फसवणूक

सुनिल येरपुडे हा विमानतळावरील पोस्ट विभागात असून एअरमेल डिव्हिजन ऑफीसमध्ये सॉर्टर असिस्टंट म्हणून काम करत होता. तो परदेशातून तसेच इतर राज्यातून आलेले पार्सल चोरी करायचा. यांत रजिस्टर्ड नसलेल्या धनादेशाचा समावेश असायचा. त्यानंतर हे धनादेश तो पैशाच्या मोबदल्यात संजय जैनकडे देत असे. संजय हा चेक त्याच्या साथीदारांना सोपवत असे. त्यानंतर खाडाखोड करून चेकची रक्कम आपल्या खात्यात वळती करून घेत असत. त्यानंतर हे सगळे ठरल्याप्रमाणे पैसे वाटून घेत.

जुलै महिन्यात परदेशातून पाठवलेला धनादेश न मिळाल्याने गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना संजय आणि त्याच्या साथीदारांवर अशाप्रकारच्या गुन्ह्याची नोंद असल्याचे समोर आल्याने त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला.

गेल्या वर्षभरापासून हा सगळा प्रकार सुरू असून आतापर्यंत या टोळीने शेकडो नागरिकांची फसवणूक केल्याची शक्यता मालमत्ता कक्षाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.


हेही वाचा -

बँक कर्मचाऱ्यांनीच मारला डल्ला, बिल्डरच्या खात्यातून काढले ८६ लाख



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा