'नोटाबंदी'नंतर आता राज्यात 'लोटाबंदी'


SHARE

काळ्या पैशाविरोधात सर्जिकल स्ट्राईक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील वर्षी नोटाबंदीचा निर्णय घेतला. याच पार्श्वभूमीवर राज्य हागणदारीमुक्त करण्यासाठी सरकारने उघड्यावर शाैचास बसणाऱ्यांवर 'सर्जिकल ट्राईक' करण्याचे ठरवले असून त्याअंतर्गत 'लोटाबंदी'चा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बबनराव लोणीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे तुम्ही 'लोटा' घेऊन उघड्यावर शौच करत असाल तर सावधान. कारण तुमच्यावर कुठल्याही क्षणी कारवाई होऊ शकते.


'ही' होणार कारवाई

तुम्ही हातात 'लोटा' घेऊन शौच करताना पकडले गेल्यास तुमच्या हातातला लोटा जप्त केला जाईल. त्यानंतर या 'लोट्या'चा चारचौघात लिलाव केला जाईल, असेही स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले.


२०१८ पर्यंत महाराष्ट्र हागणदारी मुक्त?

राज्यातील १३ जिल्हे हागणदारीमुक्त झाले असून, २०१८ पर्यंत राज्य हागणदारीमुक्त करणार असल्याची माहिती लोणीकर यांनी दिली.


महाराष्ट्राची भरीव कामगिरी

पालघर, जालना हे दोन्ही जिल्हे हागणदारीमुक्त. देशात स्वच्छता अभियान राबवणारे महाराष्ट्र क्रमांक १ चे राज्य झाले आहे. शहरी भागात ८ लाख कुटुंबाला शौचालय देण्यात सरकारला यश.हेही वाचवा -

'हमी द्या, तरच कचरा उचलणार!' - आयुक्त अजोय मेहता निर्णयावर ठामडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

संबंधित विषय