रवी पुजारीच्या शूटर्सना अटक, आरोपींचे शिल्पा शेट्टी कनेक्शन


रवी पुजारीच्या शूटर्सना अटक, आरोपींचे शिल्पा शेट्टी कनेक्शन
SHARES

ठाण्यातील एका नामांकीत बिल्डरच्या ऑफिसवर गोळीबार करण्यास आलेल्या दोन शूटर्सना एन्काऊंटर स्पेशलीस्ट प्रदीप शर्मा यांनी अटक केली आहे. या प्रकरणाचं कनेक्शन बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्याशी असल्याचं म्हटलं जात आहे. शिल्पा शेट्टीने पराग साडीची जाहिरात केली होती. पण या जाहिरातीचे पूर्ण पैसे तिला मिळाले नव्हते. त्यामुळे पराग साडीच्या मालकांना शिल्पाचे पूर्ण पैसे देण्यासाठी धमकावण्यात आलं होतं. नितीन राय (४२) आणि दिनेश राय (५१) अशी या दोघांची नावं असून हे दोघेही रवी पुजारीचे शूटर्स आहेत.




काय आहे प्रकरण?

घोडबंदर येथील एका नामांकीत बिल्डरकडून गँगस्टर रवी पुजारीने १० कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. खंडणी दिली नाही म्हणून बिल्डरच्या घोडबंदरमधील पातलीपाडा येथील ऑफिसवर शुक्रवारी फायरिंग करण्याची धमकी त्यांनी दिली होती. पण बिल्डरने न घाबरता ही माहिती एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना दिली. 

त्यानंतर पोलिसांनी या परिसरात सापळा रचला. संध्याकाळी दोन व्यक्ती या परिसरात संशयास्पदरित्या फिरताना पोलिसांना दिसले. खबऱ्याने या दोघांना ओळखल्यावर दोघांनाही ताब्यात घेण्यात आलं. या दोघांकडून दोन पिस्तूल आणि चार जीवंत काडतूसे जप्त करण्यात आली. या प्रकरणी ठाणे खंडणीविरोधी पथकाकडून चौकशी सुरू आहे.



आरोपींचं शिल्पा शेट्टी कनेक्शन

काही वर्षांपूर्वी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने पराग साडीची जाहिरात केली होती. या जाहिरातीचे पूर्ण पैसे देण्यासाठी पराग साडीच्या मालकांना धमकावण्यात आलं होते. घाटकोपरला राहणारा दिनेश राय हा फजलूर रेहमान गॅंगसाठी काम करायचा. मालक शिवनारायण अगरवाल यांना देण्यात आलेल्या धमकीप्रकरणी दिनेशला अटक झाली होती. शिवनारायण अगरवाल यांची माहिती पुरवल्याबद्दल दिनेशला २००४ साली सूरत पोलिसांनी अटक केली होती.


हेही वाचा - 

रवी पुजारीच्या हस्तकाला अटक



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा