Advertisement

कर्मचारी राज्य विमा महामंडळात ६५५२ पदांसाठी भरती

कर्मचारी राज्य विमा महामंडळामध्ये (ईएसआयसी) तब्बल ६५५२ जागा भरण्यात येणार आहेत. या जागांसाठी भरती प्रकिया सुरू झाली आहे.

कर्मचारी राज्य विमा महामंडळात ६५५२ पदांसाठी भरती
SHARES

कर्मचारी राज्य विमा महामंडळामध्ये (ईएसआयसी) तब्बल ६५५२ जागा भरण्यात येणार आहेत. या जागांसाठी भरती प्रकिया सुरू झाली आहे. भरतीमध्ये अपर डिव्हिजन क्लार्क, अपर डिव्हिजन क्लार्क कॅशियर, स्टेनोग्राफरची पदं भरली जाणार आहेत.  

अप्पर डिव्हिजन क्लार्क, अपर डिव्हिजन कॅशियरच्या ६३०३ आणि स्टेनोग्राफरच्या २४६ जागा भरल्या जाणार आहेत. अर्ज भरण्याची प्रक्रिया २ मार्चपासून सुरू झाली आहे. अर्ज भरण्याची अखेरची तारीख ३१ मार्च २०२१ पर्यंत आहे. इच्छुक उमेदवार ईएसआयसीच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज करु शकतात.

ईएसआयसीने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, स्टेनोग्राफर पदासाठी अर्ज करणारे उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून बारावी उत्तीर्ण असावेत. तर अप्पर डिव्हिजन क्लार्क आणि अप्पर डिव्हिजन कॅशियर या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी घेतलेली पाहिजे. यासह उमेदवारास मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून संगणकीय ज्ञान असले पाहिजे. त्याचबरोबर उमेदवारांचे वय १८ ते २७ वर्षे असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासकीय निकषानुसार वयाची सवलत देण्यात येईल.

अप्पर डिव्हिजन क्लार्क/ अप्पर डिव्हिजन कॅशियर पदाची निवड लेखी परीक्षा व फिटनेस परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे. तर स्टेनोग्राफर पदासाठी मुलाखतीच्या आधारे पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा