Advertisement

जिओ 5जी देशात उभारणार जगातील सर्वात मोठं ५ जी नेटवर्क

पहिल्या टप्प्यातील जिओ 5 G इंटरनेट सेवा दिल्ली, मुंबईत सुरू होणार असून पुढील वर्षापर्यंत देशभरात इंटरनेट सेवा देण्यात येणार आहे.

जिओ 5जी देशात उभारणार जगातील सर्वात मोठं ५ जी नेटवर्क
SHARES

रिलायन्स जिओ 5जी इंटरनेट सेवा दिवाळीपासून सुरू होणार असल्याची घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी केली. पहिल्या टप्प्यातील जिओ 5 G इंटरनेट सेवा दिल्ली, मुंबईत सुरू होणार असून पुढील वर्षापर्यंत देशभरात इंटरनेट सेवा देण्यात येणार आहे.

मुकेश अंबानींनी जिओ फाइव्ह जीची घषणा करताना, “मला या ठिकाणी एक घोषणा करायची आहे. जीओच्या वाटचालीमधील हा पुढील टप्पा असून डिजीटल कनेक्टेव्हीटी खास करुन फिक्स ब्रॉडबॅण्डच्या क्षेत्रातील हे महत्वाचं पाऊल आहे, ज्याचं नाव आहे जीओ फाइव्ह जी. फाइव्ह जीच्या माध्यमातून आपण १०० मिलियन घरांना जोडणार आहेत. यापूर्वी कधीही न अनुभवलेली कनेक्टीव्हीटी या माध्यमातून स्मार्ट होम सोल्यूशन्स उपलब्ध करुन देईल,” असा विश्वास व्यक्त केला.

जीओ फाइव्ह जीची सेवा दिवाळीपासून सुरु होईल. ही पहिल्या टप्प्यातील सेवा असेल. सुरुवातीला केवळ चार शहरांमध्ये ही सेवा सुरु केली जाईल. दिवाळीच्या कालावधीमध्ये या सेवेचा शुभारंभ होईल. दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकात्यामध्ये ही सेवा पुरवली जाईल. डिसेंबर २०२३ पर्यंत फाइव्ह जीची सेवा अनेक छोटी शहरं, तालुके आणि गावांमध्येही पोहचेल असा विश्वास मुकेश अंबानींनी व्यक्त केला आहे.



हेही वाचा

कोकणातील गणपती स्पेशल गाड्यांच्या तिकीट दरात वाढ

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा