Advertisement

कोकणातील गणपती स्पेशल गाड्यांच्या तिकीट दरात वाढ

तिकीटाचा दर वाढल्याने चाकरमान्यांचे बजेट कोलमडलं आहे.

कोकणातील गणपती स्पेशल गाड्यांच्या तिकीट दरात वाढ
SHARES

गणेशोत्सवानिमित्त (Ganeshotshav) कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन मध्य रेल्वेनंतर आता पश्चिम रेल्वेने कोकणासाठी ६ जोडी विशेष गाड्या चालवण्याची व्यवस्था केली आहे. तसेच एकूण 266 गाड्या चालवण्यात येणार आहे.

यंदाच्या वर्षी गावाला गणपतीला जाणाऱ्या चाकरमान्यांच्या रेल्वेच्या तिकीट दरात तीस टक्के वाढ करण्यात आली आहे. तिकीटाचा दर वाढल्याने चाकरमान्यांचे बजेट कोलमडलं आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने कोकणासाठी विशेष रेल्वेच्या 60 फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्या मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनस येथून धावतील.

मुंबई सेंट्रल ते कोकण दरम्यान 6 फेऱ्या होणार असून पहिली 23 आणि 24 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. तसेच, मुंबई सेंट्रल ते मडगाव जंक्शन मार्गावर 34 फेऱ्या असतील. जी 24 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

दरम्यान, गणेशोत्सवानिमित्त मुंबई ते कोकणातील मेल-एक्स्प्रेस गाड्यांचे तिकीट फुल्ल झाले आहे. वेटिंग तिकीट सुद्धा मिळण्याची शक्यता कमी आहे.

यंदा गौरी-गणपतींचे विसर्जन सहाव्या दिवशी होणार असून, परतीच्या प्रवासासाठी तिकीट काढण्यासाठी प्रवाशांची गर्दी झाली आहे. 6 आणि 7 सप्टेंबर रोजी परतीच्या प्रवासासाठी स्लीपर क्लासची प्रतीक्षा यादीची तिकिटेही उपलब्ध नाहीत. इतर श्रेण्यांमध्येही दीर्घ प्रतीक्षा यादी आहे.

कोरोनामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची संख्या गेल्या दोन वर्षांत कमी झाली आहे. यंदाची गर्दी पाहता मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली असली तरी नियमित गाड्यांबरोबरच विशेष गाड्यांची प्रतीक्षा यादी लांबली असून काही रेल्वे श्रेणींची प्रतीक्षा यादी खेदजनक आहे.

31 ऑगस्टपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. सावंतवाडी-दिवा गाडीतही वेटिंग लिस्टची तिकिटे उपलब्ध नाहीत. 7 सप्टेंबर रोजी परतीच्या प्रवासात 300 हून अधिक प्रतीक्षा यादी आहे. कोकण कन्या एक्स्प्रेसचा स्लीपर क्लासही सावंतवाडी आणि सिंधुदुर्गहून मुंबईला जाण्यासाठी वेटिंग तिकीट मिळेपर्यंत उपलब्ध नाही.

मांडवी एक्स्प्रेसची 6 सप्टेंबरला 'रिग्रेट' आणि 7 तारखेला 400 ची प्रतीक्षा यादी आहे, तर तुतारी एक्स्प्रेस, मडगाव-मुंबई सेंट्रल स्पेशल ट्रेन, कुडाळ-वसई स्पेशल ट्रेन, जनशताब्दी एक्स्प्रेस सीएसएमटी, सावंतवाडी-दिवा (पनवेलपर्यंत), एलटीटीटी, 6 सप्टेंबरला परतणाऱ्या सावंतवाडी-सीएसएमटी या आगामी डबलडेकर स्पेशल ट्रेनचे स्लीपर क्लास 7 सप्टेंबरला हाऊसफुल्ल आहेत.हेही वाचा

गोविंदांना सुरक्षेचं 'विमा' कवच; मनसेची चिलखत योजना

Ganesh Chaturthi 2022: आता रात्री १२ वाजेपर्यंत लाऊडस्पीकरला परवानगी

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा