Advertisement

गोविंदांना सुरक्षेचं 'विमा' कवच; मनसेची चिलखत योजना

यंदा गोविंदांना विमा सुरक्षा कवच देण्यासाठी मनसेनं पुढाकार घेतला आहे.

गोविंदांना सुरक्षेचं 'विमा' कवच; मनसेची चिलखत योजना
SHARES

मुंबईत खासकरुन दहीहंडीचा (Mumbai Dahi Handi News) उत्साह मोठ्या प्रमाणात असतो. असं असलं तरी गोविंदांच्या सुरक्षेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतात. दहीहंडीदरम्यान काही वेळा दुर्घटनांमध्ये गोविंदा जखमी किंवा मृत्यूमुखी पडतात. अशा वेळी त्यांच्या परिवाराची अवस्था बिकट होते. या पार्श्वभूमीवर यंदा गोविंदांना विमा सुरक्षा कवच देण्यासाठी मनसेनं पुढाकार घेतला आहे.

नवी मुंबईतल्या अपघातग्रस्त होणाऱ्या गोविदांना मनसेकडून ‘सुरक्ष कवच’ देऊ केले आहे. या योजनेअंतर्गत दहीहंडी फोडण्यासाठी मानवी मनोरे रचणाऱ्या 1 हजार गोविंदांचा 100 कोटींचा मोफत विमा काढण्यात येणार आहे.

दहीहंडी उत्सवाच्या दिवशी अनेक गोविंदा जखमी होतात. काही वेळा मृत्यूमुखीही पडतात. त्यांच्या नातेवाईकांना मदत मिळावी यासाठी मनसेने गोविंदासाठी ‘विमा सुरक्षा कवच’ योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेतील विम्याची मुदत 19 ऑगस्टचा पूर्ण दिवस असेल.

‘सुरक्षा कवच’ योजनेचा लाभ घेण्यासाठी गोविंदा पथकांनी मंडळाच्या लेटरहेडवर गोविंदांची वयासह नावे नोंदवून मनसे मध्यवर्ती कार्यालय, सीवूड्स येथे जमा करावीत, असं आवाहन मनसे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी केले आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या गोविंदांना किंवा पथकांना कोणताही खर्च करावा लागणार नाही, असंही गजानन काळे यांनी स्पष्ट केले.

या योजनेनुसार, गोविंदाच्या अपघाती मृत्यू आल्यास कुटुंबियांना 10 लाख रुपये, कायम स्वरुपी अंपगत्व आल्यास 10 लाख रुपये अपघातामुळे रुग्णालयातील खर्च 1 लाख रुपये असं विमा सुरक्षा कवच मनसेच्यावतीने मिळणार आहे. तरी या योजनेचा नवी मुंबईतील गोविंदांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असं आवाहन मनसेचे नवी मुंबई शहरअध्यक्ष गजानन काळेंच्या वतीने करण्यात आलं आहे.



हेही वाचा

Ganesh Chaturthi 2022: आता रात्री १२ वाजेपर्यंत लाऊडस्पीकरला परवानगी

दोन वर्षांनी भरणार वांद्रे येथील ‘माऊंट मेरी जत्रा

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा