SHARE

रिझर्व्ह बँक (आरबीआय) ५००, २ हजार आणि २०० रुपयांच्या नोटेपाठोपाठ आता १० रुपयांची नोट बाजारात आणत आहे. शुक्रवारी आरबीआयने ही नोट कशी असेल याची झलक दाखवली. १० रुपयांच्या नोटेचा रंग तपकिरी असून या नोटेवर कोणार्कच्या प्रसिद्ध सुवर्ण मंदिराचं चित्र असेल.

ही नोट देखील महात्मा गांधी सिरिजमधील असेल. नव्या नोटेसोबतच १० रुपयांची जुनी नोटही चलनात असेल. नोटेवर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी असेल.


पुढच्या बाजूने:

 • नोटवर अंकात १० लिहिलेलं आहे
 • देवनागरी भाषेतही १० लिहिलेलं आहे
 • नोटेच्या मध्यभागी महात्मा गांधीचं चित्र आहे
 • छाेट्या अक्षरांत 'RBI', ‘भारत ' आणि ‘INDIA' लिहिलेलं आहे
 • सिक्युरिटी थ्रेडवर देखील भारत आणि RBI लि‍हिलेलं आहे
 • डाव्या बाजूला अशोक चि‍न्‍ह आहे


मागच्या बाजूने:

 • उजव्या बाजूला नोट छपाईचं वर्ष आहे
 • स्वच्छ भारतचा लोगो आणि स्लोगन आहे
 • लॅग्वेज पॅनल
 • मध्यभागी कोणार्कच्या सूर्य मंदिराचं चित्र
 • देवनागिरीतही १० लिहिलेलं आहे
 • नोटेचा आकार ६५ एमएम बाय १२३ एमएम आहे


१ अब्ज नोटा छापल्या

मीडिया रिपोर्टनुसार, रिझर्व्ह बँकेने आतापर्यंत १० रुपयांच्या १ अब्ज नोटा छापल्या आहेत. सद्यस्थितीत १० रुपयांच्या ज्या नोटा चलनात आहेत, त्या नोटांमध्ये २००५ मध्ये बदल झाले होते.

५०० रुपये आणि २ हजार रुपयांच्या नोटेवर ज्या तऱ्हेने चढत्या क्रमात सिरियल क्रमांक छापण्यात आले आहेत, त्याप्रमाणेच डावीकडून उजवीकडे चढत्या क्रमाने नवीन नोटेवरही क्रमांक छापलेले असतील.

संबंधित विषय
ताज्या बातम्या