सरकारने वाढवली जुन्या नोटा स्वीकारण्याची मुदत

 Pali Hill
सरकारने वाढवली जुन्या नोटा स्वीकारण्याची मुदत

मुंबई - अत्यावश्यक सेवांचं बिल भरण्यासाठी जुन्या नोटांचा वापर 14 नोव्हेंबरपर्यंत करता येईल, असे केंद्र सरकारकडून जाहिर केल्याबरोबर मुंबईकरांनाही दिलासा मिळाला आहे. बेस्ट वीज बिल, बसपास, पाणी बिल, मालमत्ता कर आणि इतर कर भरण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. त्यामुळे आता केंद्राच्या आदेशानुसार बेस्ट प्रशासन आणि पालिकेने जुन्या नोटा स्वीकारत कर, बिल भरण्यास 14 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. बेस्ट प्रवक्त्याने दिलेल्या माहिती नुसार सर्व वीज बिल भरणा केंद्रावर जुन्या नोटा स्वीकारल्या जाणार आहेत. तर बस पास आणि पास नुतनीकरणही करता येणार आहे. पालिकेकडूनही मालमत्ता कर, पाणी बिल 14 नोव्हेंबरपर्यंत जुन्या नोट्याच्या रुपाने भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान आतापर्यंत पाणी, बिल आणि मालमत्ता कराच्या रुपाने पालिकेच्या तिजोरीत 1 कोटी 97लाख रुपये जमा झाल्याची माहिती पालिकेने दिली आहे.

Loading Comments