Advertisement

संदीप पाटील यांनाही नोटाबंदीची फटका


संदीप पाटील यांनाही नोटाबंदीची फटका
SHARES

शिवाजी पार्क - बीसीसीआयच्या निवड समितीचे माजी अध्यक्ष संदीप पाटील यांनाही नोटबदलीच्या निर्णयाचा फटका बसलाय. दादर शिवाजी पार्कमधील एसबीआयच्या ब्रँचमध्ये ते गेले असता त्यांना अडचणी आल्यात. संदीप पाटील यांचा मुलगा चिराग याचे लग्न आहे. त्यासाठी ते बँकेत पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी मूळ कागदपत्र हवीत असं सांगितलं. विशेष म्हणजे संदीप पाटील यांच्या मुलाचं कोर्ट मॅरेज आहे. त्यामुळे त्यांच्याकडे लग्नाची पत्रिका छापलेली नाही. दरम्यान संदीप पाटील यांनी सरकारच्या निर्णयाचं स्वागत करत आपल्याला इतर कागदांची पूर्तता झाल्यावर पैसे मिळतील अशी आशा व्यक्त केलीय.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा