देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने चालू आर्थिक वर्षात सलग सातव्यांदा व्याजदरात कपात केली आहे. एसबीआयने शुक्रवारी मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ट लेंडिंग रेट (एमसीएलआर) मध्ये ०.०५ टक्के कपात केली आहे. त्यामुळे एसबीआयचे गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्ज स्वस्त होणार आहे.
एसबीआयने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, कपातीनंतर एमसीएलआरला जोडलेल्या एका वर्ष मुदतीच्या सर्व प्रकारच्या कर्जावरील व्याजदर ८ टक्क्यांवर आले आहेत. याशिवाय बँकेने ठेवींवरील व्याजदरातही कपात केली आहे. पुरेशी तरलता असल्यामुळे ठेवींवरील व्याजदर घटवावे लागल्याचं एसबीआयने म्हटलं आहे.
एसबीआयच्याने १ वर्ष ते २ वर्ष मुदतीच्या किरकोळ ठेवींवरील व्याजदर ०.१५ टक्क्याने कमी केले आहेत. तर सर्व मुदतीच्या मोठ्या ठेवींवरील व्याजदरात ०.३० ते ०.७५ टक्क्यांची कपात केली आहे. नवीन दर १० नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत.
हेही वाचा -
'ह्या' बँकेचं कर्ज झालं स्वस्त