Advertisement

'ह्या' बँकेचं कर्ज झालं स्वस्त

खासगी क्षेत्रातील मोठी बँक एचडीएफसीने मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट म्हणजेच एमसीएलआर (MCLR) मध्ये ०.१० टक्के कपात केली आहे.

'ह्या' बँकेचं कर्ज झालं स्वस्त
SHARES

खासगी क्षेत्रातील मोठी बँक एचडीएफसीने मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट म्हणजेच एमसीएलआर (MCLR) मध्ये ०.१० टक्के कपात केली आहे. याची माहिती बँकेने आपल्या वेबसाइटवर दिली. एमसीएलआर घटल्याने बँकेचं गृह, वाहन आणि वैयक्तिक कर्ज स्वस्त होणार आहे.

 एचडीएफसीने ६ महिने मुदतीच्या व्याजदरात ०.०५ टक्के कपात केली आहे. हा व्याजदर आता ८.१ टक्के झाला आहे. तर १ वर्ष मुदतीच्या कर्जावरील व्याजदर ०.०५ टक्के कमी करून ८.३ टक्के केला आहे. याशिवाय २ वर्ष मुदतीच्या कर्जावरील व्याजदर ०.०५ टक्क्याने तर ३ वर्ष मुदतीच्या कर्जावरील व्याजदर ०.१० टक्क्याने कमी केला आहे. या मुदतीच्या कर्जावरील व्याजदर आता अनुक्रमे ८.४ आणि ८.५ टक्के झाला आहे. 

नवीन व्याजदर ७ नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत. बँकेने एक रात्र, एक महिना आणि ३ महिने मुदतीच्या कर्जाचे व्याजदर मात्र घटवले नाहीत. बँकेने याअगोदर आॅगस्टमध्ये व्याजदर कमी केले होते. यावेळी ०.१० टक्के व्याजदर घटले होते. या वर्षीच्या सुरूवातीपासून आतापर्यंत रिझर्व्ह बँकेने रेपो दरात ५ वेळा कपात केली आहे. 



हेही वाचा -

इन्फोसिस १२ हजार कर्मचाऱ्यांना काढणार

आता ऑनलाइन PAN कार्ड मिळणार




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा