Advertisement

इन्फोसिस १२ हजार कर्मचाऱ्यांना काढणार

देशातील मंदीसदृश्य परिस्थितीचा फटका आता आयटी क्षेत्रातील मोठी कंपनी इन्फोसिसलाही बसला आहे. इन्फोसिसमधील वरिष्ठ आणि मधल्या पदावर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार आहेत.

इन्फोसिस १२ हजार कर्मचाऱ्यांना काढणार
SHARES
Advertisement

देशातील मंदीसदृश्य परिस्थितीचा फटका आता आयटी क्षेत्रातील मोठी कंपनी इन्फोसिसलाही बसला आहे. इन्फोसिस १२ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे. इन्फोसिसमधील वरिष्ठ आणि मधल्या पदावर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार आहेत. याआधी आयटी क्षेत्रातील मातब्बर कंपनी कॉग्निझंटने मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली होती.

आयटी क्षेत्रातील मोठी कंपनी इन्फोसिस मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. वरिष्ठ आणि मधल्या पदावर असलेल्या कर्मचाऱ्यांना कंपनी कामावरून काढणार आहे. यानुसार इन्फोसिस १० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार असल्याची माहिती आहे. देशात सध्या मंदीसदृश्य वातावरण आहे. याची झळ आयटी कंपन्यांना बसू लागली आहे. त्यामुळे इन्फोसिस १० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार असल्याची माहिती आहे. 

असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट, व्हाइस प्रेसिडेंट, एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट यासारख्या वरिष्ठ पदांवरील अधिकाऱ्यांनाही इन्फोसिस कामावरून काढणार आहे. इन्फोसिसमध्ये एकूण १.१ लाख कर्मचारी आहेत. यापूर्वी कंपनीने कामगिरीच्या आधारावर कपात केली होती. यावेळी मात्र या आधारावर कपात केली जाणार नाही.  यामुळे अधिक कर्मचाऱ्यांच्या नोकरी जाण्याची शक्यता आहे.हेही वाचा  -

MTNL ने आणली व्हीआरएस योजना

आता ऑनलाइन PAN कार्ड मिळणार
संबंधित विषय
Advertisement