Advertisement

MTNL ने आणली व्हीआरएस योजना

कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या सरकारी टेलिकॉम कंपनी महानगर दूरध्वनी निगम लिमिटेड (एमटीएनएल) ने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ऐच्छिक सेवानिवृत्ती योजना (व्हीआरएस) जाहीर केली आहे.

MTNL ने आणली व्हीआरएस योजना
SHARES

कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या सरकारी टेलिकॉम कंपनी महानगर दूरध्वनी निगम लिमिटेड (एमटीएनएल) ने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ऐच्छिक सेवानिवृत्ती योजना (व्हीआरएस) जाहीर केली आहे. एमटीएनएलने कर्मचाऱ्यांना पाठविलेल्या नोटीसीमध्ये  म्हटलं आहे की, ३१ जानेवारी २०१० रोजी ५० वर्षे किंवा त्याहून अधिक वय पूर्ण केलेले कर्मचारी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. कर्मचाऱ्यांना ३ डिसेंबर २०१९ पर्यंत व्हीआरएससाठी नोंदणी करावी लागेल. 

सरकारने पुनरुज्जीवन पॅकेजला मान्यता दिल्यानंतर एमटीएनएलने ही व्हीआरएस योजना सुरू केली आहे. ही व्हीआरएस योजना गुजरात मॉडेलवर आधारित आहे. एमटीएनएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुनील कुमार यांनी सांगितलं की, कंपनीतील २२  हजार कर्मचाऱ्यांपैकी १५ हजार व्हीआरएस योजना घेण्यास पात्र आहेत. तसंच सरकार या कर्मचाऱ्यांना आकर्षक पॅकेजेस देऊ शकते. व्हीआरएस लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांवरील खर्च कंपनीच्या एकूण महसुलाच्या तुलनेत २५ टक्के घटेल. सध्या हा खर्च ८५ टक्के आहे. 

 केंद्र सरकारने बीएसएनएल आणि एमटीएनएलचे पुनरुज्जीवन, ४ जी स्पेक्ट्रम वाटप आणि व्हीआरएससाठी ६८ हजार ५७१ कोटी रुपयांच्या पॅकेजला मान्यता दिली आहे. व्हीआरएस योजनेनुसार, ४६ महिन्यांच्या पगार भरपाई म्हणून दिला जाऊ शकतो. एमटीएनएलला आर्थिक वर्ष २०१८-१९ मद्ये ३३८८ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. कंपनीचं एकूण उत्पन्न २० हजार १८५ कोटी रुपये राहिलं आहे. एमटीएनएलवर तब्बल २० हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. 



हेही वाचा  -

बेरोजगारांसाठी खूशखबर, पोस्टात 'एवढ्या' पदांसाठी भरती

५ वर्षात बँकांच्या 'इतक्या' शाखा झाल्या बंद




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा