Advertisement

आता ऑनलाइन PAN कार्ड मिळणार

प्राप्तिकर(आयकर) विभागाकडून तात्काळ ई -पॅन मिळणार आहे. प्राप्तिकर विभाग पॅन कार्ड ऑनलाइन उपलब्ध करून देणार आहे.

आता ऑनलाइन PAN कार्ड मिळणार
SHARES

आपल्या सर्वांना अनेक कामांसाठी पॅन (आता पर्मनंट अकाउंट नंबर - PAN) कार्डची गरज भासते. इन्कम टॅक्स फाइल करणे, बँक खातं उघडणे, आर्थिक देवाण-घेवाण आदी अनेक कामांसाठी पॅन कार्ड आवश्यक आहे. पॅन कार्ड मिळवण्यासाठी फॉर्म भरल्यानंतर १५ दिवसात पॅन कार्ड मिळते. आता मात्र, प्राप्तिकर(आयकर) विभागाकडून तात्काळ ई -पॅन मिळणार आहे. प्राप्तिकर विभाग पॅन कार्ड ऑनलाइन उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे  कार्यालयात न जाताच नागरिकांना पॅन कार्ड मिळणार आहे. 

 ऑनलाइन पॅन मिळवण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक असणार आहे. पुढील काही आठवड्यांपासून ही सुविधा सुरू होणार आहे.  ज्यांच्याकडे पॅन आहे तसंच काही कारणास्तव पॅनची ड्युप्लिकेट कॉपी हवी आहे, त्यांनाही  ऑनलाइन पॅन मिळणार आहे. ही  ई -पॅनची सुविधा मोफत असणार आहे. https://www.pan.utiitsl.com/PAN/newA.do या संकेतस्थळावरून आॅनलाईन पॅनसाठी अर्ज करता येणार आहे. 

अर्जदाराला  ई -पॅनसाठी आधार क्रमांक द्यावा लागेल. त्यानंतर ओटीपीद्वारे त्याला व्हेरिफिकेशन करावं लागेल. आवश्यक माहिती दिल्यावर अर्जदाराला इतर कागदपत्र देण्याची गरज पडणार नाही.  अर्जदाराला डिजिटल हस्ताक्षर असलेले  ई -पॅन मिळणार आहे.  यावर QR कोड असेल. यामुळे डेमोग्राफिक डेटासोबत अर्जदाराचा फोटोही काढता येणार आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी QR कोडची माहिती एनक्रिप्टेड असणार आहे. 



हेही वाचा -

MTNL ने आणली व्हीआरएस योजना

५ वर्षात बँकांच्या 'इतक्या' शाखा झाल्या बंद




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा