Advertisement

SBI चे ‘एफडी’वरील व्याजदर ६ वर्षांत ‘इतके’ घटले

स्टेट बँकेचे नवे व्याजदर १० फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत. यामुळे कर्जाचे व्याजदर घटण्यासोबतच ठेवींच्या व्याजदरांमध्येही कपात होणार आहे.

SBI चे ‘एफडी’वरील व्याजदर ६ वर्षांत ‘इतके’ घटले
SHARES

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या स्टेट बँक आॅफ इंडिया (SBI) ने मार्जिनल काॅस्ट आॅफ फंड बेस्ड व्याजदरां (MCLR) मध्ये ०.०५ टक्क्यांनी नुकतीच कपात केली आहे. बँकेचे नवे व्याजदर १० फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत. यामुळे कर्जाचे व्याजदर घटण्यासोबतच ठेवींच्या व्याजदरांमध्येही कपात होणार आहे.  

हेही वाचा- आधार असेल तर ई-पॅन त्वरित उपलब्ध होणार

कारण एसबीआयने (SBI) ठेवींवरील व्याजदारांमध्ये ०.१० टक्क्यांपासून ०.५० टक्क्यांपर्यंत व्याजदर (interest rate) कपातीचा निर्णय घेतला. हे नवे व्याजदर देखील १० फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. या कपातीमुळे १ ते १० वर्षे कालावधीच्या ठेवींवर आता ६.१० टक्क्यांऐवजी ६ टक्के व्याज मिळेल. तर वरिष्ठ नागरिकांना आपल्या ठेवींवर ६.६० टक्क्यांऐवजी ६.५० टक्के व्याज मिळेल. मागील ६ वर्षांमध्ये बँकेच्या ठेवींच्या व्याजदरांमध्ये तब्बल ३ टक्क्यांची घट झाली आहे.

२ कोटी रुपयांखालील ठेवींसाठी व्याजदर

कालावधीसध्याचे व्याजदर१० फेब्रुवारीपासून व्याजदरकपात
7-45 दिवस4.50%4.50%0
46-179 दिवस5.50%5%0.50%
180-210 दिवस5.80%5.50%0.30%
211 दिवस-1 वर्षे
5.80%5.50%0.30%
1-2 वर्षे6.10%6%0.10%
2-3 वर्षे6.10%6%0.10%
3-5 वर्षे6.10%6%0.10%
5-10 वर्षे6.10%6%0.10%


२ कोटी रुपयांखालील ठेवींसाठी व्याजदर (वरिष्ठ नागरिकांसाठी)

कालावधीसध्याचे व्याजदर१० फेब्रुवारीपासून व्याजदरकपात
7-45 दिवस5%5%0
46-179 दिवस6%5.50%0.50%
180-210 दिवस6.30%6%0.30%
211 दिवस-1 वर्षे
6.30%6%0.30%
1-2 वर्षे6.60%6.50%0.10%
2-3 वर्षे6.60%6.50%0.10%
3-5 वर्षे6.60%6.50%0.10%
5-10 वर्षे6.60%6.50%0.10%

 

स्टेट बँकेने (SBI) ‘एमसीएलआर’मध्ये (MCLR) कपात केल्यामुळे आता कर्जावरील एक वर्षांचा ‘एमसीएलआर’चा दर ७.९० टक्क्यांऐवजी ७.८५ टक्के होणार आहे. एसबीआयचे बहुतांश कर्ज एक वर्षांच्या ‘एमसीएलआर’वर आधारीत आहे. परंतु रिझर्व्ह बँकेने (RBI) गुरूवारी पतधोरण सादर करताना रेपो रेटमध्ये कुठलाही बदल केला नसल्याने या कपातीचा फायदा रेपो रेटशी (repo rate) जोडलेल्या ग्राहकांना मिळणार नाही.

हेही वाचा- विमा पॉलिसीवर खूश नसल्यास ती परत करू शकता, 'हा' आहे नियम

कर्जांच्या व्याजदरांमधील कपातीचा परिणाम ठेवींच्या व्याजदरांवरही झाला आहे. या काळात ठेवींच्या व्याजदरांत तब्बल ३ टक्क्यांची घट झाली आहे. एसबीआयच्या (SBI) १ ते २ वर्षांच्या ठेवींवरील (FD) व्याजदरांत ३ टक्क्यांनी घट झाली आहे. २०१४ साली १ ते २ वर्षे कालावधींच्या ठेवींवर ९ टक्क्ये व्याज मिळत होते. नव्या कपातीनंतर त्यात घट होऊन या ठेवींवर आता ६ टक्के व्याज मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या १ ते २ वर्षे कालावधींच्या ठेवींचे व्याजदर (intreast rate) मागील ६ वर्षांमध्ये २.७५ टक्क्यांनी घटले आहेत. 

रिझर्व्ह बँकेने (RBI) गेल्या वर्षी २०१९ मध्ये फेबुवारी ते आॅक्टोबर दरम्यान ५ वेळेस रेपो रेट १.३५ टक्क्यांनी घटवला होता. परंतु या दरम्यान बँकेने एमसीएलआरमध्ये (MCLR) केवळ ०.५० टक्क्यांचीच कपात केली होती.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा