Advertisement

आधार असेल तर ई-पॅन त्वरित उपलब्ध होणार

आधार कार्डची (Aadhaar card) माहिती दिल्यानंतर त्वरित ऑनलाईन पॅनकार्ड (pan card) देण्याची सुविधा या महिन्यापासून सुरू केली जात आहे.

आधार असेल तर ई-पॅन त्वरित उपलब्ध होणार
SHARES

आधार कार्डची  (Aadhaar card) माहिती दिल्यानंतर त्वरित ऑनलाईन पॅनकार्ड  (pan card) देण्याची सुविधा या महिन्यापासून सुरू केली जात आहे. महसूल सचिव अजय भूषण पांडे यांनी गुरुवारी ही माहिती दिली.२०२०-२१ च्या अर्थसंकल्पात ही सुविधा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. याबाबतची यंत्रणा तयार होत असून या महिन्यापासून ही सुविधा सुरू होईल, असं पांडे यांनी सांगितलं. 

या प्रक्रियेविषयी बोलताना पांडे म्हणाले की, ई-पॅन (e pan) मिळवू इच्छिणाऱ्या व्यक्तीला आयकर विभागाच्या वेबसाइटवर जावे लागेल. तिथे आधार नंबर नमूद करावा लागेल.  आधारमध्ये दिलेल्या मोबाइल (mobile) नंबरवर ओटीपी (otp)पाठविला जाईल. त्यानंतर आधारचा तपशील ओटीपीमार्फत पडताळला जाईल. यानंतर लगेचच पॅन देण्यात येईल. आपण हा ई-पॅन डाउनलोड करू शकतो. 

पॅन कार्ड (pan card)  आधारशी जोडणे सरकारने बंधनकारक केले आहे. आतापर्यंत ३०.८५ कोटी पॅन आधारशी जोडले गेले आहेत. मात्र, २७ जानेवारी २०२० पर्यंत १७.५८ कोटी पॅन आधारशी जोडणे बाकी होते.  पॅनला आधारशी जोडण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२० आहे.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा