Advertisement

एसबीआयकडून एनईएफटी, आरटीजीएस व्यवहारांवरील शुल्क रद्द


एसबीआयकडून एनईएफटी, आरटीजीएस व्यवहारांवरील शुल्क रद्द
SHARES

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने एनईएफटी आणि आरटीजीएस व्यवहारांवरील शुल्क रद्द केले आहे.  त्यामुळे  १ जुलै २०१९ पासून इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंगद्वारे केलेल्या एनईएफटी आणि आरटीजीएस व्यवहारांवर शुल्क आकारण्यात येणार नाही. तर १ ऑगस्ट २०१९ पासून आयएमपीएस सेवेसाठी आकारण्यात येणारे शुल्कही बँक रद्द करणार आहे. 

रिझर्व्ह बँकेने एनईएफटी आणि आरटीजीएस व्यवहारांवरील शुल्क रद्द केल्यानंतर एसबीआयने हा निर्णय घेतला आहे.  एसबीआयने बँक शाखेतून व्यवहार करणाऱ्या ग्राहकांसाठी एनईएफटी आणि आरटीजीएस व्यवहारांवरील शुल्कात २० टक्के कपात केली आहे. आयएमपीएसद्वारे फंड ट्रान्सफर करताना एक हजार रुपयांपर्यंतच्या रकमेसाठी कोणतंही शुल्क आकारण्यात येणार नाही. केंद्र सरकारचं डिजीटल अर्थव्यवस्थेचं स्वप्न साकार करण्यासाठी एसबीआयने हे पाऊल उचलले आहे, असं स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक (रिटेल आणि डिजीटल बँकिंग) पी. के. गुप्ता म्हणाले

 
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा