नरिमन पॉइंट - बँक खुल्या झाल्यानंतर अनेक ठिकाणी नागरिकांच्या लाबंच लांब रांगा पाहायला मिळाल्या. नरीमन पॉईंट, कफ परेड परिसरातील सर्व बँका नेहमीच्या वेळेत उघडल्या. आणि पैसे बँकेत जमा किंवा बदलण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली. नागरिकांना उशिरापर्यंत रांगेत उभं राहावं लागलं. तर एवढी लांब रांग लागेल याची कल्पनाच नसल्याचं एसबीआय बँकेचे सुरक्षारक्षक शिवाजी पवार यांनी सांगितलं. इंडियन बँकेचे व्यवस्थापकांकडे विचारणा केली असता, आम्हाला बँक लवकर उघडण्याचे आदेश नव्हते. माझ्याकडे 20 हजार रुपये आहेत, मात्र 500 , 1000 च्या नोटांमुळे मला त्याचा वापर करता येत नसल्याचं' गडचिरोली येथुन मुंबईला आलेला प्रशांत मिर्झा यांनी म्हटले.