कुणी सुट्टे पैसे देतं का सुट्टे पैसे ?

मुंबई - गुरुवारपासून काही बँकेच्या एटीएममध्ये 500 आणि 2000 रुपयांच्या नोटा मिळायला सुरुवात झाली. पण 500 आणि 2000 रुपयांचे सुट्टे शोधता शोधता मुंबईकरांना घाम फुटला. स्थानिक दुकांदारापासून ते भाजी विक्रेत्यापर्यंत सर्वांचेच सुट्टे पैसे नसल्यानं वांदे झाले. कुणाकडेच सुट्टे नसल्याचं समोर आलं. त्यामुळे नोट मिळाली पण त्याचं करायचं काय? असा प्रश्न मुंबईकरांना पडला. पाहा कशा प्रकारे सुट्ट्या पैशांच्या शोधात दारोदारी भटकावं लागलं.

मुंबई लाइव्हनं घेतलेल्या आढाव्यात दुकानदारांपासून ते भाजीविक्रेत्यांपर्यंत सर्वांकडेच 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा असूनही काहीच उपयोग नसल्याचं समोर आलं. त्यामुळे 500 आणि 2000 रूपयांच्या तुलनेत सुट्टे पैशांचे भाव वधारले असचं म्हणावं लागेल.

Loading Comments