बिझनेसची बोल बच्चनगिरी

प्रभादेवी - तुमचा व्यवसाय काय आहे. तो इतरांपर्यंत पोहचवून व्यवसायाची वाढ कशी कराल. यासाठी उद्यमी महाराष्ट्र या संस्थेनं महाराष्ट्रातल्या अनेक छोट्या मोठ्या व्यवसायिकांना संधी उपलब्ध करून दिलीय. उद्यमी महाराष्ट्र या संस्थेचा हा पहिलाच प्रयत्न होता. या पहिल्या प्रयत्नालाच महाराष्ट्रभरातल्या अनेक व्यवसायिकांनी उपस्थिती लावली. प्रभादेवीच्या पु. ल. देशपांडे अकादमीत व्हीके ग्रुपच्या विनय कुमार यांनी व्यवसायिकांना मार्गदर्शनही केलं. मराठी माणूस व्यवसाय करायला पुढे येत नाही. अशा लोकांना मनोबल आणि मार्गदर्शनाची आवश्यकता असते. असं मत या वेळी अनेकांनी व्यक्त केलं. 1 मिनिटाच्या कालावधीत आपल्या व्यवसायाविषयी बोलणं आणि ते पटवून देणे हे अनेकांसाठी या वेळी कसोटीचं ठरलं. 

Loading Comments