• चिनी कंपनीवर सरकार मेहरबान?
SHARE

मुंबई - एकीकडे देशामध्ये चिनी उत्पादनांच्या विरोधात लोकांची भावना असताना मात्र दुसरीकडे राज्य सरकार चिनी कंपन्यांवर मेहरबान असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. चायनाच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्माण करणाऱ्या कंपनीच्या शिष्टमंडळाने बुधवारी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली. यावेळी या कंपनीला महाराष्ट्रात सर्वोतोपरी मदत करण्याचं आश्वासन सुभाष देसाई यांनी दिलंय. ही कंपनी चीनमधील रेफ्रिजरेटर व त्याचे सुटे भाग, मायक्रोव्हेव, वॉटर हिटर आदी ग्राहकोपयोगी वस्तू बनविणारी मोठी कंपनी आहे. तसेच ही कंपनी महाराष्ट्रात 7 हजार करोड रुपयांची गुंतवणूक करण्यास इच्छुक आहे. एवढंच नाही तर लिनो ग्रुप या दुसऱ्या चीनी कंपनीनेही राज्यात सुमारे 6 हजार 700 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास उत्सुकता दाखवली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या