बँक कर्मचारी करताहेत जास्त वेळ काम


  • बँक कर्मचारी करताहेत जास्त वेळ काम
SHARE

मुंबई- 1000-500 च्या नोटा बंद झाल्याचा जेवढा त्रास नागरिकांना झाला तेवढाच त्रास बँक कर्मचाऱ्यांना झाल्याचं चित्र सगळीकडेच पाहायला मिळाल. ग्राहकांच्या सेवेसाठी बँक कर्मचाऱ्यांनी वेळेपेक्षाही जास्त काम केल्याचं गेल्या काही दिवसांपासून निदर्शनास आलंय. मोदींच्या या निर्णयाचा त्रास आता जरी होत असला तरी भविष्यात याचा फायदा होईल अशी आशा नागरिकांना आहे. काळ्यापैश्यांच्या सर्जिकल स्ट्राईकसाठी नागरिकांसोबत बँक कर्मचारीही सहकार्य करतायेत. मात्र मोदींच्या लढ्याला किती यश मिळतंय आणि किती काळा पैसा जमा होतोय याचं उत्तर मिळायला थोडा वेळ जाईल हे मात्र नक्की

संबंधित विषय
ताज्या बातम्या