आर्थिक गुन्हे शाखेला दोन उपायुक्त!

 Mumbai
आर्थिक गुन्हे शाखेला दोन उपायुक्त!

मुंबई - पोलीस दलामध्ये तीन उपायुक्तांच्या बदल्या मंगळवारी जाहीर करण्यात आल्या. मुख्य म्हणजे यातील दोन उपायुक्तांची नेमणूक आर्थिक गुन्हे शाखेमध्ये करण्यात आलीय.

शहरात आर्थिक गुन्ह्याचे वाढते प्रमाण आणि दाखल होणाऱ्या या गुन्ह्यांच्या तपासाचा भार लक्षात घेता आर्थिक गुन्हे शाखेमध्ये दोन पोलीस आयुक्तांची पदं निर्माण करण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त एस. जयकुमार यांची या पदावरून 5 हजार 600 कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या तपासासाठी उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. तर जयकुमार यांच्या जागी परिमंडळ 2 चे उपायुक्त संदिप कर्णिक यांची नियुक्ती करण्यात आलीय.

कर्णिक यांच्या रिक्त जागी विशेष शाखा 1 चे उपायुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांची नेमणूक केलीय. चव्हाण यांच्या बदलीमूळे रिक्त झालेल्या पदाचा अतिरीक्त कार्यभार गुन्हे शाखा (प्रतिबंधक) उपायुक्त एस. एस. बुरसे यांच्याकडे सोपवण्याचे आदेश देण्यात आलंय.

Loading Comments