मराठी उद्योजकांचे पाऊल पडती पुढे

विलेपार्ले - विलेपार्लेतल्या द ललित हॉटेलमध्ये 'उद्योगबोध' हा कार्यक्रम झाला. यात पंधराशेपेक्षा अधिक उद्योजक उपस्थित होते. उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्या, चढउतार आदी विषयांवर या कार्यक्रमात चर्चा झाली. तर, उद्योग क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल अनेक उद्योजकांचा गुणगौरवही करण्यात आला. सॅटर्डे क्लबतर्फे हा सोहळा आयोजित केला गेला होता. सॅटर्डे क्लबचे ब्रँड अॅम्बेसिडर आणि अभिनेते संदीप कुलकर्णी यांनीही कार्यक्रमाला हजेरी लावली. या निमित्तानं उद्योजकांसाठी 'उद्योगबोध' हे मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या व्यासपीठामुळेच अनेक उद्योजक यशाचे शिखर गाठत आहेत.

Loading Comments