Advertisement

घरबसल्या 10 मिनिटात पॅनकार्ड मिळणार, 'अशी' आहे प्रक्रिया

आता घरबसल्या 10 मिनिटात पॅनकार्ड मिळवता येणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरूवारी पॅनकार्ड तात्काळ ऑनलाइन मिळवण्यच्या सुविधेची सुरूवात केली आहे.

घरबसल्या 10 मिनिटात पॅनकार्ड मिळणार, 'अशी' आहे प्रक्रिया
SHARES

आता घरबसल्या 10 मिनिटात पॅनकार्ड मिळवता येणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरूवारी पॅनकार्ड तात्काळ ऑनलाइन मिळवण्यच्या सुविधेची सुरूवात केली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष बोर्ड (CBDT) ने गुरुवारी यासंदर्भात माहिती दिली. ज्यांच्याकडे पॅन नसेल त्यांना या प्रक्रियेतून पॅन मिळणार आहे. याशिवाय तात्काळ ऑनलाइन पॅन मिळवण्यासाठी तुमचा आधार आणि मोबाइल नंबर लिंक असणं गरजेचे आहे. आधारवर जन्मतारीखही असणंही आवश्यक आहे.


केंद्रीय प्रत्यक्ष बोर्डने दिलेल्या माहितीनुसार, या सुविधेचं बिटा व्हर्जन फेब्रवारी 2020 मध्येच सुरू करण्यात आले होते. ही सुविधा आयकर विभागाच्या फायलिंग पोर्टलवर ट्रायल बेसिसवर सुरू करण्यात आली होती. मात्र आता ही योजना अधिकृतरित्या लाँच करण्यात आली आहे. पॅन कार्ड देण्याची ही प्रक्रिया पूर्णपणे पेपरलेस असेल. अर्जदारांना  ई-पॅनसाठी कसलंही शुल्क द्यावं लागणार नाही. 


अशी आहे प्रक्रिया

1. ऑनलाइन पॅनकार्डसाठी अर्ज करणाऱ्यांना आयकर विभागाच्या e-Filing पोर्टल वर जाऊन "Instant PAN through Aadhaar" मध्ये दिसणाऱ्या "Quick Links" वर क्लिक करावं लागेल.

2. या पेजवर "Get New PAN" या पर्यायावर क्लिक करा

3. या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर टाकावा लागेल. त्यानंतर एक ओटीपी जेनरेट करण्यासाठी कॅप्चा कोड देखील टाकावा लागेल. तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी पाठवला जाईल. 

4. पुढच्या स्टेपमध्ये आधार कार्डची माहिती व्हॅलिडेट करावी लागेल.

5. तुम्हाला तुमचा Email देखील व्हॅलिडेट करण्याची गरज आहे.

6. यूनिक आयडेंटिटी अॅथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) कडून e-KYC डेटा व्हॅलिडेट केल्यानंतर तुम्हाला इनस्टंट पॅन दिले जाईल. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याकरता कमीत कमी 10 मिनिटं लागतील.

7. यानंतर "Check Status/ Download PAN" वर क्लिक केल्यानंतर PDF फॉरमॅटमध्ये तुम्ही पॅन डाऊनलोड करू शकता.



हेही वाचा -

राज्यात मान्सून ८ जूनपर्यंत दाखल होणार

कांदिवलीच्या कामगार रुग्णालयात १५० खाटांचं कोरोना रुग्णालय




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा