Advertisement

सरकारचा सर्वसामान्यांना दिलासा


सरकारचा सर्वसामान्यांना दिलासा
SHARES

मुंबई - केंद्र सरकारनं पैसे काढण्याची आणि भरण्याची मर्यादा वाढवल्यानं सर्वसामान्यांना दिलासा मिळालाय. रविवारी केंद्रीय अर्थमंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा दिवसाला 2000 ऐवजी 2500 करण्यात आली. तर बँकांमधून 4500 रूपये मूल्याच्या नोटा बदली करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय दिवसाला बँक खात्यांमधून पैसे काढण्याची 10 हजारांची मर्यादाही हटवण्यात आली आहे. तसंच आठवड्याला पैसे काढण्याची 20 हजारांची मर्यादा 24 हजार करण्यात आली आहे. याशिवाय पेन्शन धारकांसाठी जमा करण्याच्या वार्षिक हयातीच्या दाखल्याची मुदत 15 जानेवारी 2017 करण्यात आली आहे.

10 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर या चार दिवसांमध्ये 500 आणि 1000 नोटांमध्ये तब्बल 3 लाख कोटींची रक्कम देशभरात बँकांमध्ये जमा झाली आहे. तर तब्बल 50 हजार कोटी रूपये वेगवेगळ्या बँकांमधून आणि एटीएममधून खातेदारांना देण्यात आले आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा