Advertisement

पुढच्या आठवड्यात येणार झोमॅटोचा IPO

ऑनलाइन फूड डिलेव्हरी करणाऱ्या झोमॅटोला IPO बाजारात आणण्याची परवानगी मिळाली आहे.

पुढच्या आठवड्यात येणार झोमॅटोचा IPO
SHARES

ऑनलाइन फूड डिलेव्हरी करणाऱ्या झोमॅटोला IPO बाजारात आणण्याची परवानगी मिळाली आहे. झोमॅटो या माध्यमातूत तब्बल ९ हजार ३७५ कोटींचे भांडवल उभारणार आहे. देशातील एका स्टार्टअपकडून येणारा हा सर्वात मोठा IPO असणार आहे.

सेबीकडून परवानगी मिळाल्यामुळे पुढच्या आठवड्यात IPO बाजारात येईल. IPO ची दारे १४ जुलैला सर्वसामान्यांना खुली होणार आहेत. १६ जुलैपर्यंत अवधी असणार आहे. झोमॅटो यातून ९ हजार कोटींचे भांडवल गोळा करणार आहे.

३७५ कोटी ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून उभे केले जाणार आहेत. गुंतवणूकदार ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून आपला हिस्सा विकतात. तर जवळपास ६५ लाख इक्विटी शेअर्स हे कंपनीच्या कामगारांसाठी राखीव असणार आहे.

७२ ते ७६ रुपये दरम्यान झोमॅटोच्या एका शेअर्सची किंमत ठरवण्यात आली आहे. गुंतवणूकदारांना किमान १९५ इक्विटी शेअर्स घ्यावे लागतील. जर एका शेअर्सची किंमत सर्वात अधिक ७६ रुपये पकडली. तर १९५ शेअर्सची किंमत १४ हजार ८२० एवढी होते.

पण गुंतवणूकदारांना यावरही चार्ज भरावा लागणार आहे. कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी, मॉर्गन स्टेनली इंडिया कंपनी आणि क्रेडिट सुइस सेक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेट यावरही आयपीओ विक्रीचे व्यवस्थापन करण्यात आले आहे.

झोमॅटोच्या उत्पादनात आर्थिक वर्ष २०२० मध्ये ९६ टक्क्यांनी वाढ झाली होती. कंपनीचा महसूल २०१९ मध्ये १ हजार ३९८ कोटीवरून २०२० या आर्थिक वर्षात २ हजार ७४३ कोटी रुपये झाला होता. पण कोरोना संकटामुळे यंदाच्या आर्थिक वर्षात झोमॅटोच्या उत्पादनात घट झाली.

आर्थिक वर्षे २०२१ च्या पहिल्या तिमाहीत झोमॅटोने १ हजार ३६७ कोटींचा महसूल जमा केला. तर कंपनीचा खर्च जवळपास १ हजार ७२४ कोटी रुपये एवढा होता. त्यामुळे कंपनीला ६८४ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. पण असे असले तरी या कंपनीचे भविष्य उज्ज्वल असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

पब्लिक कंपनीत झोमॅटो कंपनीचे रुपांतरण झालं आहे. त्याचबरोबर मेमोरॅन्डम ऑफ असोसिएशनमध्ये बदल केला आहे. येत्या काळात अॅपवरून होणारी वाढती मागणी पाहता कंपनीचा व्यवसाय वाढत जाईल, असं जाणकारांचं म्हणणं आहे.


हेही वाचा

आरबीआयची १४ बँकांवर कारवाई, कोट्यावधींचा दंड ठोठावला

भारत पेट्रोलियममध्ये १६८ जागांसाठी भरती

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा