Advertisement

जुहू येथे पाळीव प्राण्यांसाठी 'पेट पार्क' ची स्थापना

जुहू बीचवरील नोवोटेल हॉटेलच्या समोर स्थित जागेवर स्थानिक भाजप आमदार अमित साटम यांच्या निधीतून हे पार्क विकसित करण्यात आले आहे.

जुहू येथे पाळीव प्राण्यांसाठी 'पेट पार्क' ची स्थापना
SHARES

जुहूमधील (juhu) रहिवासी आणि पाळीव प्राणी प्रेमींसाठी 'पेट पार्क' (pet park) सुरू करण्यात आले आहे. शहरातील पाळीव प्राण्यांसाठी ही जागा महत्त्वाची ठरणार आहे.

जुहू बीचवरील नोवोटेल हॉटेलच्या समोर स्थित जागेवर स्थानिक भाजप आमदार अमित साटम यांच्या निधीतून हे पार्क विकसित करण्यात आले आहे.

या पार्कचे उद्घाटन चित्रपट निर्माते आणि सामाजिक कार्यकर्ते अशोक पंडित यांनी रहिवाशांच्या उपस्थितीत केले. या प्रकल्पाचे काम सप्टेंबरमध्ये सुरू झाले होते आणि  ते आता वापरासाठी खुले केले गेले आहे.

 "हे पेट पार्क जुहू (juhu) बीचवरील सात गार्डन्सपैकी एक आहे आणि शहरातील हिरवळीचे प्रमाण वाढवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे," असे आमदार अमित साटम म्हणाले.

तसेच अमित साटम (amit satam) पुढे म्हणाले, "हे पार्क एकेकाळी महापालिकेचे (bmc) उद्यान होते जे डंपिंग ग्राउंड आणि असामाजिक कारवायांसाठी वापरले जात होते. आता, ते एका पाळीव प्राण्यांसाठीच्या गार्डनमध्ये रूपांतरित झाले आहे."

या प्रकल्पामागील दृष्टिकोन स्पष्ट करताना अमित साटम म्हणाले, "गेल्या दशकात मी अंधेरी (पश्चिम) मध्ये 60 गार्डन विकसित केले आहेत. या प्रकल्पांवर काम करत असताना, मला एका पाळीव प्राण्यांच्या उद्यानाची आवश्यकता भासली आणि रहिवाशांनीही त्यांची मागणी व्यक्त केली. यामुळे या उद्यानाची निर्मिती झाली. हे पार्क पाळीव प्राण्यांना खेळण्यासाठी आणि फिरण्यासाठी आहे."



हेही वाचा

मुंबईत 13 वर्षाच्या मुलीला जीबीएसची लागण

जुहू: 16 मार्चला #JustWalkIndia चे आयोजन



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा