Advertisement

नाशिकमध्ये बुधवारपासून १० दिवसांचा कडक लाॅकडाऊन!

नाशिक शहरात देखील कडक लाॅकडाऊन लावण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

नाशिकमध्ये बुधवारपासून १० दिवसांचा कडक लाॅकडाऊन!
SHARES

मुंबईतील कोरोना संक्रमण थोडफार आटोक्यात येत असलं, तरी मुंबई बाहेरील शहरातील परिस्थिती बिकट होत असल्याचं चित्र महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात दिसून येत आहे. परिणामी एकापाठोपाठ एक करत अनेक जिल्ह्यात कडक लाॅकडाऊन लावण्यात येत आहे. याचप्रमाणे आता नाशिक शहरात देखील कडक लाॅकडाऊन लावण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. 

कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने १४ एप्रिलपासून संचारबंदीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर जिल्हाबंदीसह कडक निर्बंध लागू करण्यात आले. कडक निर्बंध लादूनही लोकांची वर्दळ न थांबल्याने कोरोनाचा संसर्ग फैलावतच राहीला. परिणामी राज्यात दररोज ५० ते ६० हजार नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. काही जिल्ह्यातील परिस्थिती आटोक्यात येत असली, तरी काही जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक बघायला मिळत आहे. त्यामुळे जिल्हास्तरावरील प्रशासन आता आपापल्या अधिकार क्षेत्रात लाॅकडाऊन लावण्याचा निर्णय घेत आहेत.

हेही वाचा- कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात कडक लाॅकडाऊन!

त्यानुसार नाशिक शहरातील कोरोना विषाणू प्रादुर्भावाची स्थिती लक्षात घेता शहरात १० दिवसांचा लाॅकडाऊन लावण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे. बुधवार १२ मे दुपारी १२ वाजेपासून या कडक लॉकडाऊनला सुरूवात होईल. तर २३ मे रोजी दुपारी १२ वाजता लॉकडाऊनची मुदत संपेल. या कालावधीत अत्यावश्यक आणि रुग्णालये, औषध दुकाने अशा वैद्यकीय सेवा वगळता इतर सर्व सेवा आणि दुकानं बंद राहणार आहेत. या काळात कुणालाही घराबाहेर पडता येणार नाही, अशी माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.

याआधी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातही कडक लाॅकडाऊनचा निर्णय घेण्यात आलेला आहे.   

नाशिकमध्ये ९ मे २०२१ पर्यंत १५३१५ कोरोनाबाधित अॅक्टिव्ह रुग्ण होते. तर आतापर्यंत १६६० कोरोना रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे. कोविड परिस्थितीमुळे वाढलेल्या मृतदेहांच्या अंत्यसंस्कारामुळे नागरीकांना मृतदेहांच्या अंत्यसंस्काराकरीता प्रतिक्षा करावी लागत असून, मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत आहे.

(10 day strict lockdown in nashik city from 12th may 2021)


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा