अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना दसरा भेट

 Pali Hill
अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना दसरा भेट

मुंबई - अग्निशमन दलातील 11 अधिकाऱ्यांना दसऱ्याचा दिवस शुभ ठरलाय. दसऱ्याच्या दिवशी 11 अधिकाऱ्यांना बढती देण्यात आलीय. यात आर. एन. अम्बुलकर, एस.डी. सावंत, डि. के. घोष आणि एच.आर.शेट्टी या चार अधिकाऱ्यांना सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी या पदावरून विभागीय अग्निशमन अधिकारी या पदावर बढती देण्यात आलीय. तर डी. एस. पाटील, आर. डी. भोर, के. आर. यादव , के. डी. घाडीगावकर, व्ही. एम. मैनकर, व्ही. डी. मयेकर आणि एस. जी. जायभाय या अधिकाऱ्यांना अग्निशमन केंद्र अधिकारी पदावरून सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी या पदावर बढती देण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख प्रभात रहांगदळे यांनी दिलीय.

Loading Comments