Advertisement

Corona virus: 11 हजार कैद्यांची पँरोलवर सुटका, गृहमंञ्यांचा मोठा निर्णय


Corona virus: 11 हजार कैद्यांची पँरोलवर सुटका, गृहमंञ्यांचा मोठा निर्णय
SHARES

कोरोना व्हायरसची खबरदारी म्हणून गृहमंत्र्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. 7 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची 45 दिवसांच्या पेरोलवर सुटका करण्याचा हा निर्णय आहे. त्यानुसार 11 हजार कैद्यांची कारागृहातून सुटका होणार आहे.

महाराष्ट्र राज्याच्या तुरूंगात सध्या क्षमतेहून अधिक कैदी ठेवण्यात आलेले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर एवढ्या मोठ्या प्रमाणात कैद्यांना एकसंघठीत ठेवणे म्हणजे आलेल्या संकटाला प्रोत्साहन देण्यासारखे आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कैद्यांना कोरोनाची लागण होऊ नये. म्हणून हा न्यायालयाने काही दिवसांपूर्वी कैद्यांच्या आरोग्याबाबत सूचना गृहविभागाला दिल्या होत्या. त्या पार्श्वभूमिवर हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.

त्यानुसार पुढील आठवड्यापासून या कैद्याची सुटका होणार असल्याची माहिती मिळत आहे. कोरोना व्हायरस हा गर्दीमुळे पसरतो कोरोनाची लागण होऊ नये म्हणून राज्यात संचारबंदी सुद्धा करण्यात आली आहे. आणि आता थेट गृहमंत्र्यांनी 7 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी शिक्षा भोगत असल्याचा निर्णय घेतला आहे. या कैद्यांना 45 दिवसांच्या पेरोलवर सोडण्यात आले असून संबधित आरोपी रहात असलेल्या विभागातील स्थानिक पोलिस ठाण्यात आठवड्याला हजेरी लावावी लागणार आहे.

पॅरोल रजा म्हणजे काय
कैद्याचा जवळचा नातेवाइक आजारी असेल किंवा मृत्यू झाल्यावर पॅरोल रजा मंजूर होते. यासाठी कैद्यी कारागृह अधीक्षकांकडे अर्ज करतो. तो अर्ज पोलीस, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठवण्यात येतो. पोलिस आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अभिप्रायानंतर कारागृह विभागीय आयुक्त कैद्याला किमान 30 दिवसांची पॅरोल रजा देतात. ती जास्तीत जास्त 90 दिवस देता येते.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा