Advertisement

सीएम चषक कार्यक्रमात डान्स करताना मुलीचा मृत्यू


सीएम चषक कार्यक्रमात डान्स करताना मुलीचा मृत्यू
SHARES

सीएम चषक कार्यक्रमात डान्स करत असताना एका 12 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. कांदिवलीतील लालडी पाला येथे आयोजित केलेल्या सीएम चषक कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली. अनिषा शर्मा असं या मृत मुलीचं नाव आहे. अनिषाने या कार्यक्रमातील नृत्य स्पर्धेत सहभाग घेतला होता.


मृत्यूच कारण अस्पष्ट

कांदिवलीतल्या लालडी पाडा येथे गेले अनेक दिवसांपासून सीएम चषकाचा कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमात अनिषा शर्मा ही नृत्य करत होती. नृत्य करता करता अचानक ती खाली कोसळली. त्यानंतर तिला जवळच्याच रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, उपचारापूर्वीच तिला डॉक्टरांनी मृत घोषित केलं.
मात्र तिच्या मृत्युचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. तिच्या नातेवाईकांनी कांदिवली पोलिसांत याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.


नगरसेवकांच्या म्हणण्यानुसार...

स्थानिय नगरसेवक कमलेश यादव यांच्या म्हणण्यानुसार "12 वर्षाची मुलगी फक्त 30 सेकंदपर्यंतच मंचावर नृत्य करू शकली. कारण नृत्य करतानाच ती अचानक खाली कोसळली. त्यानंतर तातडीने तिला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. हा एक अपघात आहे. लापरवाही नाही. मुलांसाठी खाण्या पिण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या मुलांना 4 ते 5 वाजेच्या दरम्यान लंच ब्रेकही दिला होता. ही सर्व मुलं दीड ते दोन वाजेच्या सुमारास या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी आली होती.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा