Advertisement

देवनार डम्पिंग ग्राऊंडलगतच्या १२७ अनधिकृत झोपड्या हटविल्या


देवनार डम्पिंग ग्राऊंडलगतच्या १२७ अनधिकृत झोपड्या हटविल्या
SHARES

देवनार डम्पिंग ग्राऊंडलगत आणि आदर्श नगर नाल्याजवळील १२७ अनधिकृत झोपड्या बुधवारी मुंबई महापालिकेकडून तोडण्यात अाल्या. डम्पिंग ग्राऊंड परिसरात अनुचित घटना घडू नयेत यासाठी यासाठी महापालिकेने डम्पिंग ग्राऊंडच्या सभोवताली संरक्षण भिंत बांधण्याचे काम हाती घेतले होते. मात्र, या येथील अनधिकृत झोपड्या संरक्षक भिंतीच्या कामासाठी अडथळे ठरत होत्या. 


भिंत उभारण्यात अडथळा

गोवंडी परिसरातील आदर्शनगर नाल्याजवळ १२७ अनधिकृत झोपडपट्ट्या होत्या. या झोपडपट्ट्यांमुळे संरक्षण भिंत उभारण्याच्या कामात अडथळा निर्माण होत होता. त्यामुळं मंगळवारी महापालिकेचे परिमंडळ ५ चे उपायुक्त भारत मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली या झोपडपट्ट्यांवर धडक कारवाई करण्यात आली असून त्या हटवण्यात आल्या आहेत. त्यामुळं आता याठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.




हेही वाचा - 

व्हाॅट्स अॅपवर विवाहितेला अश्लील मेसेज

गुगलवर पत्ता शोधणं पडलं महागात; वृद्धाला ९८ हजारांना गंडवलं




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा