गुगलवर पत्ता शोधणं पडलं महागात; वृद्धाला ९८ हजारांना गंडवलं


गुगलवर पत्ता शोधणं पडलं महागात; वृद्धाला ९८ हजारांना गंडवलं
SHARES

 काही अडचणी आल्या की अापण तातडीने मोबाइलवरून गुगलची मदत घेतो. पवईतील एका वृद्धाला हीच मदत घेणं महागात पडलं आहे. एका बँकेचा नंबर शोधत असताना त्यांच्या हाती सायबर चोरट्याचा नंबर लागला आणि त्याने वृद्धाकडून सर्व माहिती घेत त्यांची जमापुंजी हडपली. 


खात्याची माहिती घेतली

पवई परिसरात राहणारे दत्ताराम मालपेकर हे विक्रोळी येथील खासगी कंपनीत कामाला होते. त्यामुळे कंपनीजवळील एका बँकेत त्यांनी खाते उघडले होते.  काही कामानिमित्ताने मालपेकर विक्रोळी येथील बँकेत गेले असता बँकेची शाखा घाटकोपर येथे स्थलांतरित झाल्याचे त्यांना समजले. बँकेचा नवीन पत्ता नसल्यामुळे त्यांनी  गुगलवर पत्ता शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संबंधित बँकेच्या माहितीखाली एक नंबर त्यांना आढळून आला. या नंबरवर मालपेकर यांनी फोन करून बँकेसंदर्भातील माहिती विचारली. त्यावेळी समोरील व्यक्तीने मालपेकर यांना त्यांच्या खात्याविषयी सर्व माहिती विचारली. त्यानंतर काही सेकंदातच त्यांच्या मोबाइलवर एक मेसेज आला. मालपेकर यांच्या खात्यातून ९८ हजार रुपये काढले होते. 


निवृत्तीचे पैसे हडपलेे

 या खात्यावर त्यांचे निवृत्तीनंतर मिळालेले पैसे जमा झाले होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मालपेकर यांनी पवई पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. या प्रकरणी पवई पोलिसांनी तक्रार नोंदवत तपास सुरू केला आहे. त्या सायबर चोरट्याने गुगलच्या मदतीने बँक शाखेच्या खाली स्वतःचा नंबर दिल्यामुळे ही फसवणूक झाल्याचं उघडकीस अालं अाहे.हेही वाचा - 

पोलिस दलातील भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या सुनील टोकेंवरच निलंबनाची कारवाई

म्हाडा अध्यक्ष उदय सामंत म्हणतात, 'माझ्या जीवाला धोका', मागितली पोलिस सुरक्षा
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा