म्हाडा अध्यक्ष उदय सामंत म्हणतात, 'माझ्या जीवाला धोका', मागितली पोलिस सुरक्षा

सामंत यांनी घेतलेल्या काही निर्णयांमुळे म्हाडाची प्रतिमा जनसामान्यांमध्ये सुधारू लागली आहेत. तर दुसरीकडे फसव्या बिल्डर आणि दलालांना आळा बसू लागला आहे. त्यामुळेच समाजकंटकांकडून आपल्या जीवाला धोका आहे, आपल्याला धमक्यांचे फोन येत असल्याचं म्हणत सामंत यांनी पोलिसांकडे सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याची मागणी केली आहे.

म्हाडा अध्यक्ष उदय सामंत म्हणतात, 'माझ्या जीवाला धोका', मागितली पोलिस सुरक्षा
SHARES

म्हाडा प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारून ३ महिने उलटले नाही तोच उदय सामंत यांना धमक्या येऊ लागल्या आहेत. त्यामुळे आपल्या जीवाला धोका असल्याचं म्हणत सामंत यांनी पोलिस महासंचालकांनाच पत्र लिहिलं आहे. आपल्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याची मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे. एवढंच नाही, तर आपल्या जीवाचं काहीही बरं वाईट झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.


महत्त्वाचे निर्णय

सामंत हे शिवसेनेचे रत्नागिरीचे आमदार आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून रिक्त असलेल्या म्हाडाच्या अध्यक्षपदावर ३ महिन्यांपूर्वीच त्यांची वर्णी लागली. म्हाडा प्राधिकरणाचं अध्यक्षपद हे अत्यंत महत्त्वाचं पद असून म्हाडातील अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्याचे अधिकार या पदाकडे असतात. त्यानुसार सामंत यांनी म्हाडा अध्यक्षपदाची धुरा सांभाळताच अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. घरांच्या किंमती कमी करत नागरिकांना दिलासा दिला. रहिवाशांना फसवणारे विकासक, दलालांच्या मुसक्या आवळण्यासाठी पुढाकार घेतला.


जीवाला धोका

या निर्णयामुळे म्हाडाची प्रतिमा जनसामान्यांमध्ये सुधारू लागली आहेत. तर दुसरीकडे फसव्या बिल्डर आणि दलालांना आळा बसू लागला आहे. त्यामुळेच समाजकंटकांकडून आपल्या जीवाला धोका आहे, आपल्याला धमक्यांचे फोन येत असल्याचं म्हणत सामंत यांनी पोलिसांकडे सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याची मागणी केली आहे.


पत्र मिळताच कारवाई

याविषयी पोलिस उपायुक्त (प्रवक्ते) मंजुनाथ शिंगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सामंत यांचं पत्र अद्याप हाती पडलेलं नसल्याचं सांगितलं आहे. पत्र मिळाल्याबरोबर पुढील चौकशी करत आवश्यक ती कार्यवाही करू असंही त्यांनी 'मुंबई लाइव्ह'ला सांगितलं आहे. तर सामंत हे पुणे मंडळाच्या लाॅटरीत व्यस्त असल्यानं त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.



हेही वाचा-

एनसीएलएटीचा पत्राचाळ बिल्डरला दणका; गोरेगावमधील पत्राचाळीची जागा म्हाडाचीच

म्हाडाच्या अर्जासाठी अनामत रक्कम होणार कमी



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा