व्हॅाट्स अॅपच्या माध्यमातून विवाहितेची बदनामी करणाऱ्या दिल्लीतील तरुणाला मंगळवारी एअरपोर्ट पोलिसांनी अटक केली आहे. रवि उर्फ रविकांत धिमान असं या आरोपीचं नाव आहे. न्यायालयाने त्याला बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
मिरारोड परिसरात २६ वर्षीय विवाहिता पती आणि मुलांसोबत राहते. काही महिन्यांपूर्वी ती नातेवाईकांकडे लग्न समारंभासाठी पंजाबला गेली होती. लग्न उरकून ती दिल्ली विमानतळाहून मुंबईला येण्यासाठी निघाली. दिल्लीहून मुंबईला आल्यानंतर तिने विमानतळावर तिचा फोन सुरू केला. त्यावेळी तीन ते चार अश्लील मेसेज एकाच नंबरहून आले. संबंधीत नंबरवर जाब विचारण्यासाठी फोन केला असता समोरील व्यक्तीने हा नंबर धिमानने दिला असल्याचं सांगितलं.
त्यानंतर धिमानकडूनच वारंवार तरुणीला अश्लील मेसेज येऊ लागले. धिमानच्या या त्रासाला कंटाळलेल्या तरुणीने अखेर विमानतळ पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली त्याचा या कृत्यामागील हेतू अद्याप त्याने सांगितला नसून पोलिस त्याच्याकडे चौकशी करत आहेत.
हेही वाचा -
गुगलवर पत्ता शोधणं पडलं महागात; वृद्धाला ९८ हजारांना गंडवलं
पोलिस दलातील भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या सुनील टोकेंवरच निलंबनाची कारवाई