Advertisement

अनुसूचित जातीसाठी 15 प्रभाग आरक्षित


अनुसूचित जातीसाठी 15 प्रभाग आरक्षित
SHARES

मुंबई - मनपा फेब्रुवारी 2017 च्या निवडणुकीत अनुसूचित जातींसाठी 11 एवजी 15 प्रभाग आरक्षित असणार आहेत. मुंबई शहरातील लोकसंख्येत घट होऊन उपनगरांमधील लोकसंख्येत वाढ झाली आहे. यामध्ये अनुसूचित जातीतील लोकसंख्येचा भरणा अधिक आहे. परिणामी 227 पैकी 15 प्रभाग अनुसूचित जातीसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत. गेल्या निवडणूकीच्या तुलनेत अनुसूचित जातीच्या प्रभागात 4 प्रभागांनी वाढ झाली आहे.

नव्या रचनेनुसार 534 हजार ते 55 हजार नागरिकांसाठी एक नगरसेवक असणार आहे. तसेच बरेचसे प्रभाग रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूला, पूर्व आणि पश्चिमेला विस्तारलेले आहेत. नव्या रचनेत मात्र हे प्रभाग रेल्वेमार्गाच्या अलिकडे किंवा पलिकडे असे असणार आहे. 2017 च्या निवडणुकीसाठी पालिकेने अऩुसूचित जातीची लोकसंख्या असलेल्या 60 प्रभागांची यादी निवडणूक आयोगाला सादर केली होती. त्यानुसार 15 प्रभागाला मान्यता देण्यात आली असून या आरक्षणाची सोडत 3 आक्टोबरला होणार आहे.

संबंधित विषय
Advertisement