Advertisement

पाणथळीवरील १५० झोपड्या पालिकेने तोडल्या

चेंबूर येथील छेडानगरच्या पाणथळ जागांवर अतिक्रमण केलेल्या १५० झोपड्या सोमवारी मुंबई महापालिकेने तोडल्या. या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून चर खोदण्याचं काम पालिकेने सुरू केलं आहे.

पाणथळीवरील १५० झोपड्या पालिकेने तोडल्या
SHARES

चेंबूर (chembur) येथील छेडानगरच्या पाणथळ (mangrove) जागांवर अतिक्रमण (Encroachment) केलेल्या १५० झोपड्या सोमवारी मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation)  तोडल्या. या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून चर खोदण्याचं काम पालिकेने सुरू केलं आहे. याशिवाय येथे गस्तही घालण्यात येणार आहे. या झोपड्या कांदळवन परिसरामध्ये भराव टाकून उभारण्यात आल्या होत्या. 

छेडानगर येथील कांदळवनावर भराव घालून अतिक्रमण (Encroachment) करण्यात आहे. भराव आणि अतिक्रमणामुळे या भागात येणारे भरती-ओहोटीचे पाणी थांबल्याने कांदळवनाचा नाश झाला आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींनी वारंवार तक्रारी केल्या. अखेर कांदळवन कक्ष, महसूल विभाग, मुंबई महापालिका, मुंबई पोलिस यांनी संयुक्तपणे  कारवाई करत अतिक्रमणे तोडली. कांदळवन विभागाकडून झालेल्या या कारवाईचे पर्यावरणप्रेमींनी स्वागत केले आहे.

याबाबत मध्य मुंबईचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश वरक यांनी सांगितलं की, ही जागा अजूनही महसूल विभागाच्या ताब्यात आहे. ती जागा कांदळवनाच्या ताब्यात आली की, मग सीसीटीव्ही लावण्यासारख्या उपाययोजनाही इथे राबवण्यात येतील. या परिसरात कुंपण घालण्यासाठी प्रस्ताव दिलेला आहे. याठिकाणी उभे-आडवे चर खणले की, येथे घरं बांधण्यावर नियंत्रण येईल.

महाराष्ट्र सुरक्षा बलाचे ४० कर्मचारी कर्मचारी कांदळवन, पाणथळ जागांवर अतिक्रमण होऊ म्हणून गस्त घालतात. कर्मचारी संख्या पुरेशी नसल्याने तीन पाळ्यांमध्ये गस्त घालता येत नाही. रात्री ७ ते ८ वाजेपर्यंत हे कर्मचारी कार्यरत असतात. चिता कॅम्प, कामराज नगर, कुलाबा येथे अतिक्रमण झाले होते. तिथे या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येत आहे.हेही वाचा  -

म्हाडा बांधणार नॅनो घरे, किंमत असणार ‘इतकी’

पश्चिम रेल्वेच्या बोरिवली स्थानकात 'हेल्थ' एटीएम
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा