Coronavirus cases in Maharashtra: 510Mumbai: 278Pune: 57Islampur Sangli: 25Ahmednagar: 20Nagpur: 16Navi Mumbai: 16Pimpri Chinchwad: 15Thane: 14Kalyan-Dombivali: 10Vasai-Virar: 6Buldhana: 6Yavatmal: 4Satara: 3Aurangabad: 3Panvel: 2Ratnagiri: 2Kolhapur: 2Palghar: 2Ulhasnagar: 1Sindudurga: 1Pune Gramin: 1Godiya: 1Jalgoan: 1Nashik: 1Washim: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 21Total Discharged: 42BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

म्हाडा बांधणार नॅनो घरे, किंमत असणार ‘इतकी’

सध्या मुंबईत मोकळ्या जागेची कमतरता आणि रखडलेले पुनर्विकास प्रकल्प यामुळे म्हाडाला लाॅटरीतील (mhada housing lottery) घरांची संख्या वाढवणं कठीण होऊन बसलं आहे. यावर मात करण्यासाठी आता म्हाडाने नॅनो घरे (neno homes) उपलब्ध करून देण्याचं ठरवलं आहे.

म्हाडा बांधणार नॅनो घरे, किंमत असणार ‘इतकी’
SHARE

मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न बघणाऱ्या प्रत्येक सर्वसामान्य गृहखरेदीदाराचं लक्ष महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात म्हाडाच्या (Mhada) मुंबई मंडळाकडून दरवर्षी काढण्यात येणाऱ्या लाॅटरीकडे असतं. परंतु सध्या मुंबईत मोकळ्या जागेची कमतरता आणि रखडलेले पुनर्विकास प्रकल्प यामुळे म्हाडाला लाॅटरीतील (mhada housing lottery) घरांची संख्या वाढवणं कठीण होऊन बसलं आहे. यावर मात करण्यासाठी आता म्हाडाने नॅनो घरे (nano homes) उपलब्ध करून देण्याचं ठरवलं आहे. 

हेही वाचा- म्हाडा करणार कामाठीपुऱ्याचा पुनर्विकास

म्हाडाच्या मुंबईत ५६ वसाहती असून त्यापैकी बहुतांश वसाहतींचा पुनर्विकास (redevelopment) रखडलेला आहे किंवा धिम्या गतीने सुरू आहे. शिवाय नवीन घरे बांधण्यासाठी म्हाडाच्या हाती हव्या त्या प्रमाणात मोकळ्या जागाही नसल्याने दरवर्षी लाॅटरीत (mhada housing lottery) कुठल्या घरांचा समावेश करायचा असा प्रश्न म्हाडाच्या मुंबई मंडळाला पडतो. त्यामुळे म्हाडाने आपलं लक्ष मुंबई आणि मुंबई बाहेरील खासगी जागांकडे वळवलं आहे. यामाध्यमातून स्वस्तात गृहनिर्मिती करता येईल, असं म्हाडाला वाटत आहे. म्हाडाची घरं ही इतर खासगी विकासकांच्या तुलनेत स्वस्त असावीत, अशी सर्वसामान्य गृहखरेदीदारांची अपेक्षा असते. त्यासाठीच ते दरवर्षी म्हाडाच्या लाॅटरीकडे लक्ष ठेवून असतात. पण जेव्हा म्हाडाच्या घरांची किंमत अव्वाच्या सव्वा पातळीवर जाते, तेव्हा त्यांचा मोठा भ्रमनिरास होतो. 

या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी म्हाडाने खाजगी जमीन मालकांची जमीन घेऊन तसंच ना विकास क्षेत्रात नॅनो घरे (nano homes) बांधून मुंबईसह राज्यातील गृहखरेदीदारांना स्वस्तातील घरे उपलब्ध करून देण्याचा विचार सुरू केला आहे. तशा प्रकारच्या सूचना गृहनिर्माण विभागाकडून म्हाडा अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचं राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (housing minister jitendra awhad) यांनी सांगितलं.

हेही वाचा- म्हाडा मंडळावरील नियुक्त्या रद्द, भाजप नेत्यांना फटका

मुंबई शहर, उपनगर तसंच राज्यातील इतर ग्रामीण भागातील सरकारी जमीन आणि ना विकास क्षेत्रातील जमिनीवर घरे बांधण्याचा शासनाचा विचार आहे. त्यासाठी संबंधित खात्याकडून सर्व परवानग्या मिळवल्यानंतर परवडणारी घरे बांधता येतील. या घरांच्या किंमती साधारणत: ३ ते ४ लाख रूपयांपर्यंत ठेवण्यात येईल, असंही आव्हाड यांनी स्पष्ट केलं. नॅनो घरांची (nano homes) अधिकाधिक निर्मिती झाल्यास सर्वसामान्य गृहखरेदीदारांना मोठा दिलासा मिळू शकेल. सध्या तरी म्हाडाची लाॅटरी कधी निघेल, याची उत्सुकता गृहखरेदीदारांना लागली आहे. या लाॅटरीत मुंबईतील घरांची संख्या नेहमीप्रमाणे कमी असण्याची शक्यता आहे. या

संबंधित विषय
संबंधित बातम्या