
महाराष्ट्रात (maharashtra) जानेवारी-फेब्रुवारी 2026 या कालावधीत 45,168 इलेक्ट्रिक वाहनांची (EV vehicles) विक्री झाली आहे, असे ‘क्लीन मोबिलिटी शिफ्ट’च्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
गेल्या वर्षी याच कालावधीत 37,848 वाहने विकली गेली होती, त्या तुलनेत यंदा 19 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.
सध्या सुरू असलेल्या पश्चिम आशियातील संघर्षाने इंधन पुरवठा साखळी किती असुरक्षित असू शकते आणि पेट्रोल (petrol)-डिझेलपासून दूर जाणे का गरजेचे आहे, याची नव्याने जाणीव करून दिली आहे.
ही वाढ प्रामुख्याने वैयक्तिक वाहनांच्या बाबतीत दिसून येत आहे. जानेवारी-फेब्रुवारी 2026 मध्ये इलेक्ट्रिक दुचाकी आणि चारचाकी वाहनांची विक्री 34,570 युनिट्सवर पोहोचली, तर एकट्या फेब्रुवारी महिन्यात राज्यभरात 20,135 ईव्हीची विक्री झाली.
व्यावसायिक विभागातील मालवाहतूक आणि सामायिक वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक तीन-चाकी वाहनांच्या विक्रीत फारशी वाढ झालेली नाही.
या कालावधीत त्यांची विक्री 3,278 वरून केवळ 3,368 युनिट्सपर्यंत पोहोचली आहे. सध्या ईव्ही स्थित्यंतर हे घरगुती पातळीवर होत आहे.
मालवाहतूक किंवा सामायिक वाहतूक क्षेत्रात अद्याप अपेक्षित बदल दिसत नाही, जिथे इंधन आयातीचा भार तुलनेने अधिक आहे.
राज्य सरकारने ‘विद्युत वाहन धोरण 2025 अंतर्गत 2026-27 या वर्षासाठी खासगी व सार्वजनिक इलेक्ट्रिक वाहतुकीला चालना देण्यासाठी 246 कोटींची तरतूद केली आहे.
उद्योगांनी या निर्णयाचे स्वागत केले असले तरी अनुदानाचे प्रमाण अपुरे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा
