Advertisement

बर्ड फ्लूमुळे राज्यात आतापर्यंत १९४०६ पक्षांचा मृत्यू

राज्यात ८ जानेवारीपासून २८ जानेवारीपर्यंत एकूण १९४०६ विविध पक्षांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

बर्ड फ्लूमुळे राज्यात आतापर्यंत १९४०६ पक्षांचा मृत्यू
SHARES

बर्ड फ्लू रोगाचा प्रादुर्भाव हिमाचल प्रदेश, राजस्थान, केरळ, दिल्ली, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरियाणा, गुजरात व मध्यप्रदेश या राज्यांतील स्थलांतरीत पक्षांमध्ये आढळून आला आहे. तसंच महाराष्ट्रामध्ये देखील काही ठिकाणी तपासणीचे निष्कर्ष होकारार्थी आले आहेत. राज्यात ८ जानेवारीपासून २८ जानेवारीपर्यंत एकूण १९४०६ विविध पक्षांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

पशुसंवर्धन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्यात २८ जानेवारी २०२१ रोजी कुक्कुट पक्षांमध्ये विविध जिल्ह्यात, जळगांव ५, अहमदनगर १०२, लातूर १५, उस्मानाबाद ६ व अमरावती इथं १४, अशी कुक्कुट पक्षांमध्ये १४२ एवढी मरतूक झालेली आहे. बगळे, पोपट, चिमण्या अशा अन्य पक्षांमध्ये विविध जिल्ह्यात ठाणे १० व रत्नागिरी १, अशी एकूण ११ इतर पक्षांची आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. कावळ्यांमध्ये विविध जिल्ह्यात मुंबई ६ व ठाणे इथं ९, अशा प्रकारे एकूण राज्यात १५ मरतुक आढळून आली आहे. महाराष्ट्र राज्यात २८ जानेवारी २०२१ रोजी एकूण १६८ पक्षांमध्ये मरतूक झाली आहे. सदर नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेच्या प्रयोगशाळेत व पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. 

हेही वाचा- जगात सर्वाधिक ‘मेट्रो’ची कामं मुंबईतच सुरू!

राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था, भोपाळ येथून नमुन्यांचे तपासणीचे निष्कर्ष २७ जानेवारी २०२१ रोजी, प्राप्त झाले. त्यामध्ये कुक्कुट पक्षांत बर्ड फ्लू साठी  होकारार्थी निष्कर्ष प्राप्त झालेले नाहीत.  यवतमाळ जिल्ह्यातील खंडाला ता. आर्वी येथील एक मोर आणि नांदेड जिल्ह्यातील हंगरगा ता. नायगांव येथील एक घुबड यांचे बर्ड फ्लूसाठी  होकारार्थी निष्कर्ष प्राप्त झाले आहेत.

कुक्कुट आणि बदक पक्षांमधील नमुने होकारार्थी आल्यानुसार, सदर क्षेत्रास “नियंत्रित  क्षेत्र” म्हणून घोषित करण्यात येत असून, तिथं प्राण्यांमधील संसर्गजन्य व संक्रामक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम,२००९ अन्वये निर्धारित प्रतिबंधक निर्देश लागू करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.  बर्ड फ्लूसाठी होकारार्थी आढळून आलेल्या, पोल्ट्री फार्मपासून १ किमी त्रिज्येच्या अंतरामध्ये येणारे सर्व कुक्कुट पक्षी, अंडी, कुक्कुट खाद्य व विष्टा शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याची प्रक्रिया करण्यात येते. आतापर्यंत बाधित क्षेत्रामधून ७१७७३ कुक्कुट पक्षी, ४४०१६ अंडी व ६३२३४ किलो खाद्य नष्ट करण्यात आले आहे.

ज्या ठिकाणी कुक्कुट पक्षांव्यतीरिक्त इतर पक्षांमध्ये होकारार्थी निष्कर्ष प्राप्त झाले आहेत, अशा ठिकाणी देखील  सर्वेक्षणाचे काम चालू आहे. तसंच ज्या ठिकाणी सॅनिटायझेशन प्रमाणपत्र निर्गमीत करण्यात आले आहेत, अशा ठिकाणी १ ते १० कि.मी. क्षेत्रामधून कुक्कुट व इतर पक्षातील घशातील, विष्ठा आणि रक्तजल नमुने सर्व्हेक्षणासाठी घेण्यात येणार आहेत.

(19406 birds died till 28 january 2021 due to bird flu in maharashtra)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा