Advertisement

गोरेगावात २०० कोरोना सैनिक सज्ज

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना गोरेगाव शाखेने २०० कोरोना सैनिकांचं पथक सज्ज केलं आहे.

गोरेगावात २०० कोरोना सैनिक सज्ज
SHARES
Advertisement

कोरोनाशी सुरू असलेल्या लढाईत डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, महापालिकेचे कर्मचारी आदी कोरोना योद्धे जीव ओतून कामास लागले आहेत. हजारो खासगी क्षेत्रातील नागरिकांनी कोरोना योद्धे म्हणून शासनाशी सहकार्य करण्यासाठी तयारी दर्शविली आहे. हे सर्व सुरू असताना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना गोरेगाव शाखेने २०० कोरोना सैनिकांचं पथक सज्ज केलं आहे.

फिव्हर क्लिनिक

प्रकृतीची साधी तक्रार असलेल्या व्यक्तिंसाठी फिवर कॅम्प सुरू करण्यात आले आहेत. गोरेगाव मेडिकल असोसिएशनचे सदस्य डॉक्टर व मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सहकार्याने गोरेगाव येथील उन्नतनगर शाळेत व हार्मनी मॉल इथं दररोज सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत ताप तपासणी करून रुग्णांना मार्गदर्शन केलं जातं. याशिवाय हे कोरोना सैनिक रुग्णालयांमध्ये दाखल होण्यासाठी रुग्णांना मदत करणे, टाळेबंदीमळे नागरिकांची खोळंबलेली कामे मार्गी लावण्यासाठी प्रशासनाशी समन्वय ठेवणे आणि तणावग्रस्तांना समुपदेशन करून धीर देणं तसंच रोगप्रतिकारशक्ती वाढिवणाऱ्या औषधांचे वाटप करणे आदी कामांमध्ये व्यग्र झाले आहेत. कोरोना सैनिकांना मास्क, सॅनिटायझर्स व पीपीए किट्सचाही पुरवठा करण्यात येत आहे.

हेही वाचा - गोरेगावातील कोरोनाग्रस्तांची संख्या हजाराच्या उंबरठ्यावर

गोरेगावात रुग्णांची वाढ

दरम्यान महापालिकेच्या पी दक्षिण वॉर्डमधील गाेरेगावातील कोरोनाग्रस्तांची संख्या १ हजाराजवळ पोहचली आहे. महापालिकेच्या के पश्चिम आणि पी उत्तर वॉर्डनं आधीच १ हजार रुग्णांचा टप्पा ओलांडला आहे. पी दक्षिणमध्ये गोरेगाव परिसरातील करोनारुग्णांची संख्या ९२५ इतकी नोंदवण्यात आली आहे. यापूर्वी के पश्चिम अर्थात अंधेरी परिसरात २१२१ रुग्णांची आणि पी नॉर्थ अर्थात मालाड भागात १११९ रुग्णांची नोंद महापालिकेनं केली आहे.

१५०० खाटा रिक्त

कोरोना नियंत्रणासाठी स्थानिक वॉर्ड अधिकाऱ्यांनी तक्रारमुक्त विलगीकरण कक्ष, फिव्हर क्लिनिकवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. गोरेगाव येथील पांडुरंग वाडी, नेस्को परिसर भागांत रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी विलगीकरणावर भर देण्यात येत आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या रुग्णांना विलगीकरणात ठेवण्यात येते. सध्या २५०० खाटांचे विलगीकरण कक्ष तयार असून त्यात सुमारे १५०० खाटा रिक्त आहेत. 

 कोरोना संसर्ग रोखण्यासाठी योग्य देखभाल, योग्य जेवण आणि आवश्यक उपचार देण्यावर भर राहणार आहे. शिवाय परिसरातील दाटीवाटीतील राहणाऱ्या नागरिकांसाठी महापालिकेतर्फे फिव्हर क्लिनिक उपाय राबवण्यात येत आहे. आत्तापर्यंत ३० क्लिनिक घेण्यात आले असून संशयितांची तातडीनं चाचणी करण्यात आली आहे. चाचणीचा निकाल येईपर्यंत त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत असल्याचं समजतं.

हेही वाचा - महाराष्ट्राच्या मदतीला केरळ, 'इतक्या' डॉक्टर्स, नर्सचं पथक मुंबईत दाखल

संबंधित विषय
Advertisement