Advertisement

महाराष्ट्राच्या मदतीला केरळ, 'इतक्या' डॉक्टर्स, नर्सचं पथक मुंबईत दाखल

केरळच्या डाॅक्टर आणि नर्सेसचं पहिलं पथक सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये पोहोचले असल्याची माहिती केरळचे आरोग्यमंत्री थॉमस इसाक यांनी दिली आहे.

महाराष्ट्राच्या मदतीला केरळ, 'इतक्या' डॉक्टर्स, नर्सचं पथक मुंबईत दाखल
SHARES

 राज्य सरकारच्या विनंतीनंतर केरळने 100 जणांची एक टीम महाराष्ट्रात पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 50 जणांची पहिली टीम मुंबईत पोहचली आहे. त्यामुळे कोरोनाविरोधातील लढ्यात आता महाराष्ट्रातील डॉक्टरांना केरळमधल्या डॉक्टर्स आणि नर्सेसची मदत होणार आहे.

केरळच्या डाॅक्टर आणि नर्सेसचं पहिलं पथक सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये पोहोचले असल्याची माहिती केरळचे आरोग्यमंत्री थॉमस इसाक यांनी दिली आहे. दुसऱ्या 50 डॉक्टर्स आणि नर्सेसचं पथकही लवकरच मुंबईत दाखल होणार आहे. देशात केरळमध्ये सर्वात पहिला कोरोना रुग्ण सापडला होता. केरळने केलेल्या शर्थीच्या प्रयत्नामुळे कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश मिळवलं. त्यानंतर त्या पॅटर्नची चर्चा सर्व देशात झाली होती.

आरोग्यमंत्री डॉ.राजेश टोपे यांनी केरळच्या आरोग्य मंत्र्यांशी चर्चा करत त्यांनी कलेले प्रयत्न जाणून घेतले होते. महाराष्ट्रातल्या आरोग्य यंत्रणेवर ताण पडत असल्याने महाराष्ट्र सरकारतर्फे मदतीसाठी डॉक्टर्स आणि नर्सेसची मदत करण्याची विनंती केरळ सरकारला करण्यात आली होती. त्या विनंतीनंतर केरळ सरकारने हे पथक पाठवलं आहे. महाराष्ट्रातल्या काही संघटनांनी केरळमधल्या नर्सेस महाराष्ट्रात येण्यास विरोध केला होता. आधी आपल्या इथे कमी असेल्या जागा भरा आणि नंतर इतर राज्यातून कर्मचाऱ्यांना बोलवा असं या संघटनांचं म्हणणं होतं.


हेही वाचा -

24 तासात कोरोना बाधित पोलिसांची संख्या 'इतकी' वाढली, तर 27 जणांचा मृत्यू

मुंबई महापालिकेच्या ९० सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा