Advertisement

गोरेगावातील कोरोनाग्रस्तांची संख्या हजाराच्या उंबरठ्यावर


गोरेगावातील कोरोनाग्रस्तांची संख्या हजाराच्या उंबरठ्यावर
SHARES

महापालिकेच्या पी दक्षिण वॉर्डमधील कोरोनाग्रस्तांची संख्या एक हजाराजवळ पोहचली आहे. महापालिकेच्या के पश्चिम आणि पी उत्तर वॉर्डनं आधीच १ हजार रुग्णांचा टप्पा ओलांडला आहे. पी दक्षिणमध्ये गोरेगाव परिसरातील करोनारुग्णांची संख्या ९२५ इतकी नोंदवण्यात आली आहे. यापूर्वी के पश्चिम अर्थात अंधेरी परिसरात २१२१ रुग्णांची आणि पी नॉर्थ अर्थात मालाड भागात १११९ रुग्णांची नोंद महापालिकेनं केली आहे.

कोरोना नियंत्रणासाठी स्थानिक वॉर्ड अधिकाऱ्यांनी तक्रारमुक्त विलगीकरण कक्ष, फिव्हर क्लिनिकवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. गोरेगाव येथील पांडुरंग वाडी, नेस्को परिसर भागांत रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी विलगीकरणावर भर देण्यात येत आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या रुग्णांना विलगीकरणात ठेवण्यात येते. सध्या २५०० खाटांचे विलगीकरण कक्ष तयार असून त्यात सुमारे १५०० खाटा रिक्त आहेत. 

हेही वाचा - Coronavirus Pandemic: मुंबईत 1437 नवे रुग्ण, दिवसभरात 38 जणांचा मृत्यू

संसर्ग रोखण्यासाठी योग्य देखभाल, योग्य जेवण आणि आवश्यक उपचार देण्यावर भर राहणार आहे. शिवाय परिसरातील दाटीवाटीतील राहणाऱ्या नागरिकांसाठी महापालिकेतर्फे फिव्हर क्लिनिक उपाय राबवण्यात येत आहे. आत्तापर्यंत ३० क्लिनिक घेण्यात आले असून संशयितांची तातडीनं चाचणी करण्यात आली आहे. चाचणीचा निकाल येईपर्यंत त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत असल्याचं समजतं.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात कोरोनाचे ११६ जणांचा बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. तसंच, मुंबईत दिवसभरात १४३७ नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत शुक्रवारी दिवसभरात ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

हेही वाचा - पायी दिंडी सोहळा रद्द...आषाढी वारीची परंपरा होणार खंडीत

राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या ६२ हजार २२८ झाली आहे. मागील ३ दिवसात कोरोनाचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून आला. ३ दिवसात २८७ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती आकडेवारीतून पुढे आली. त्यात एक आनंदाची बातमी म्हणजे ८ हजार ३८१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत ऐवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण बरे होण्याची ही पहिलीच वेळ आहे.



हेही वाचा -

दिलासादायक! धारावीत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी २५ दिवसांवर

मधुमेह रुग्णांसाठी कोरोना धोकादायक, अभ्यासातून धक्कादायक माहिती उघड



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा