Advertisement

दिलासादायक! धारावीत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी २५ दिवसांवर

मुंबईत धारावी परिसर कोरोना रुग्णांचा हाॅटस्पाॅट झाला आहे. मात्र, आता धारावीत कोरोनाचा फैलाव रोखण्यात यश येत आहे.

दिलासादायक! धारावीत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी २५ दिवसांवर
SHARES

मुंबईत धारावी परिसर कोरोना रुग्णांचा हाॅटस्पाॅट झाला आहे. मात्र, आता धारावीत कोरोनाचा फैलाव रोखण्यात यश येत आहे.  धारावीत आतापर्यंत १,६७५ कोरोना रुग्ण आढळले आहेत. यापैकी  ७०१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर धारावीतील कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी २२ ते २५ दिवसांवर पोहोचला आहे. राज्यात हाच कालावधी 14 दिवस आहे.  

धारावीत रुग्णवाढीचं प्रमाणही घटलं आहे. मुंबईतील इतर विभागांमध्ये रोजच्या रुग्णवाढीचा दर ४ ते ९ टक्क्यांवर आहे. मात्र, धारावीत प्रतिदिन सर्वात कमी म्हणजे २.६ टक्के रुग्ण वाढत आहेत. धारावीत मृतांचे प्रमाण सर्वात कमी म्हणजे एकूण रुग्णांच्या चार टक्के इतके आहे. धारावीत आतापर्यंत ७० जणांचा मृत्यू झाला आहे. धारावीची लोकसंख्या १५ ते १६ लाखांच्या आसपास असून, अत्यंत कोंदट आणि दाटीवाटीच्या या परिसरावर पालिकेने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. केंद्रीय पथकाकडूनही धारावीत भेट देऊन विशेष लक्ष ठेवले जात आहे.

धारावीत अडीच हजार आरोग्यसेवक आणि सेविका तसंच २७ खासगी डॉक्टर, २९ परिचारिका, ६८ वॉर्डबॉय, ११ सहाय्यक आणि दोन फार्मासिस्ट काम करत आहेत. धारावीत आतापर्यंत ४७ हजार ५०० जणांची घरोघरी जाऊन तपासणी करण्यात आली आहे. २५ खासगी रुग्णालयांतर्फे एक लाख ७५ हजारांहून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.  

धारावी परिसरातील दवाखान्यात दहा हजार जणांची तपासणी करण्यात आली असून, फिव्हर क्लिनिकमध्ये ३,२२४ जणांची तपासणी करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाचा अधिक धोका असल्यामुळे तीन लाख ५७ हजार ३०५ जणांची तपासणी करून गरज असणाऱ्यांवर आवश्यक उपचार सुरू करण्यात आले आहेत.



हेही वाचा -

मधुमेह रुग्णांसाठी कोरोना धोकादायक, अभ्यासातून धक्कादायक माहिती उघड

पायी दिंडी सोहळा रद्द...आषाढी वारीची परंपरा होणार खंडीत





संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा