Advertisement

कोरोनामुळं महापालिकेच्या तब्बल 'इतक्या' कर्मचाऱ्यांनी गमावले प्राण

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागासह विविध विभागातील कर्मचारी बाधित झाले आहेत. तर मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांचा बळी गेला आहे.

कोरोनामुळं महापालिकेच्या तब्बल 'इतक्या' कर्मचाऱ्यांनी गमावले प्राण
SHARES

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागासह विविध विभागातील कर्मचारी बाधित झाले आहेत. तर मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांचा बळी गेला आहे. मुंबई महापालिकेतील विविध विभागांतील तब्बल ६ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कोरोनाची बाधा झाली असून २०१ कर्मचाऱ्यांचा बळी गेला आहे. यापैकी चौघांचा मृत्यू जानेवारीनंतर झाला आहे.

मृत आणि कोरोना बाधितांमध्ये आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांबरोबरच सफाई कर्मचारी आणि अन्य विभागांतील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. आतापर्यंत केंद्र सरकारने केवळ १७, तर महापालिकेनं ६७ मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना नुकसानभरपाईची रक्कम दिली आहे. महापालिकेनं आतापर्यंत एक उपायुक्त व एक सहाय्यक आयुक्तही कोरोनाच्या संसर्गामुळं गमावले आहेत. आता फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतरही अनेक कर्मचारी मोठ्या संख्येनं बाधित होत आहेत.

कोरोनाशी दोन हात करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत ५० लाख रुपयांची नुकसानभरपाई दिली जाते. त्याअंतर्गत केंद्र सरकारने महापालिकेच्या केवळ १७ आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना नुकसानभरपाईची रक्कम दिली आहे, तर उर्वरित अर्जाची छाननी करून त्यांना पालिके तर्फे  मदत दिली जात आहे. आतापर्यंत महापालिकेनं ६७ मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५० लाखाची नुकसानभरपाई दिली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा