Advertisement

Video- सोमय्या काॅलेजमध्ये रस्सीखेच खेळताना विद्यार्थ्याचा मृत्यू


Video- सोमय्या काॅलेजमध्ये रस्सीखेच खेळताना विद्यार्थ्याचा मृत्यू
SHARES

विद्याविहार येथील के. जी. सोमय्या काॅलेजमध्ये रस्सीखेच खेळताना एका विद्यार्थ्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. जीबिन सोनी असं या विद्यार्थ्याचं नाव असून त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. गुरुवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. २२ वर्षीय जीबीन हा माझगाव येथील रहिवासी असून सोमय्या काॅलेजमध्ये नर्सिंगचं शिक्षण घेत होता.


नेमकं काय झालं?

सोमय्या काॅलेजमध्ये आयोजित स्पोर्ट्स डे निमित्त जीबीन रस्सीखेळात सहभागी झाला होता. रस्सीखेळाच्या सामन्यात जीबिन पूर्ण जोर लावून रस्सी ओढत होता. अचानक तो तोल जाऊन खाली कोसळला. जीबिनला उपस्थित विद्यार्थ्यांनी तातडीने राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचं समजत आहे.


कारण अस्पष्ट

राजावाडी रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार, जीबिनच्या मृत्यूचे कारणं अद्याप समजू शकलेलं नाही. त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार असून शवविच्छेदन अहवालानंतरच त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण समजू शकेल. याप्रकरणी टिळक नगर पोलिस तपास करत आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा