Advertisement

ठाण्यात बुधवारी २४ तास पाणीपुरवठा बंद

पाणी पुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करुन पालिकेस सहकार्य करावं असं आवाहन पाणी पुरवठा विभागाने केलं आहे.

ठाण्यात बुधवारी २४ तास पाणीपुरवठा बंद
SHARES

ठाण्यात बुधवारी २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या पिसे येथील रॉ वॉटर पंपिंग स्टेशनमध्ये वाढीव क्षमतेच्या पंपिंग मशिनरी बसविण्यासाठी तसंच इतर अत्यावश्यक कामं करण्यात येणार आहे. 

या कामांमुळे  बुधवार दिनांक २५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते गुरुवार दिनांक २६ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत ठाणे महापालिकेचा स्वतःच्या योजनेतील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत फक्त स्टेम प्राधिकरणामार्फत होणारा पाणी पुरवठा सुरु राहणार आहे.

स्टेम वॉटर डिस्ट्री.अँण्ड इन्फा.कं. प्रा.लि. यांच्याकडुन होणारा पाणी पुरवठा बुधवार दिनांक २५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत इंदिरानगर, जेलटाकी, ऋतुपार्क, साकेत व मुंब्रा या भागात सुरु राहणार आहे. तसंच बुधवार दिनांक २५ ऑगस्ट रोजी रात्री ९ ते गुरुवार दिनांक २६ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत घोडबंदर रोड, पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेट, ब्रम्हांड, विजयनगरी, गायमुख, बाळकुम, समतानगर, आकृती, सिद्धेश्वर, जॉन्सन, इंटर्निटी, कोलशेत तसेच आझादनगर या भागाचा पाणी पुरवठा सुरु राहणार आहे.

पाणी पुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करुन पालिकेस सहकार्य करावं असं आवाहन पाणी पुरवठा विभागाने केलं आहे.     

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा