Advertisement

Coronavirus pandemic: दिवसभरात 1248 रुग्णांची कोरोनावर मात, 2487 नवे रुग्ण

आतापर्यंत राज्यभरात 29 हजार 329 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या 36 हजार 031 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

Coronavirus pandemic: दिवसभरात 1248 रुग्णांची कोरोनावर मात, 2487 नवे रुग्ण
SHARES

राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या 65 हजार 655 झाली आहे. आनंदाचीबाब म्हणजे मागील दिवसभरात 1248 जणांनी कोरोनावर मात केली आहे. माञ कोरोना रुग्णांवर मात करणाऱ्यांची संख्या जरी वाढली असली, तर धोका अजून टळलेला नाही. आज दिवसभरात 2487 नवे रुग्ण आढळून आले असून दिवसभरात 89 मृत्यूंची नोंद झालेली आहे. आतापर्यंत राज्यभरात 29 हजार 329  रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या 36 हजार 031 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले. 

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 4 लाख 62 हजार 176 नमुन्यांपैकी 65 हजार 655 जण पॉझिटिव्ह आले आहेत. तर सध्या राज्यात 5 लाख 58 हजार 100 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 34 हजार 480 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात 89 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून यात मागील दोन दिवसांच्या मृत्यूची नोंद असल्याचे सांगितले जात आहे.आज एकूण संख्या 2487  झाली आहे. आज नोंद झालेल्या 89 मृत्यूंपैकी 46 पुरुष तर 43 महिला आहेत. आज नोंद झालेल्या 89 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 46  रुग्ण आहेत तर  35 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 7 जण 40 वर्षांखालील आहे. या 89 रुग्णांपैकी 56 जणांमध्ये ( 63 %)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड 19 मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 2286 झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी 39 मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित  मृत्यू हे 27 एप्रिल ते 27 मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील 50 मृत्यूंपैकी मुंबई 27, मालेगाव 6, नवी मुंबई 9, कल्याण-डोंबिवली 4, ठाणे 3, सोलापूर 1 मृत्यूंची नोंद आहे.

(टीप- आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील  दिनांक 7 मे 2020 पासूनच्या 323 रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील 140 रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड19 बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 3157 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 18 हजार 490 सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी 70.14 लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.  

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा